फोटो सौजन्य - Social Media
कारलं नाव घेतलं की डोळ्यासमोर त्याची कडू चव येते. पण आरोग्याच्या दृष्टीने कारलं हे खरं तर सुपरफूड मानलं जातं. हे मधुमेह नियंत्रणात ठेवायला मदत करतं, पचन सुधारतं, लिव्हर डिटॉक्स करतं आणि त्वचा स्वच्छ ठेवण्याचं कामही करतं. इतके फायदे असूनही अनेक लोक त्याच्या कडूपणामुळे कारल्यापासून दूर राहतात. पण काळजीचं कारण नाही! काही सोप्या घरगुती उपायांनी कारल्याची कडवट चव कमी करून त्याला चविष्ट बनवता येतं.
मीठाचा वापर
कारलं पातळ कापून त्यावर मीठ शिंपडा आणि ३० मिनिटं झाकून ठेवा. नंतर ते स्वच्छ धुवून घ्या. मीठामुळे त्यातील कडू रस बाहेर येतो.
कोमट पाणी
कापलेलं कारलं १५-२० मिनिटं कोमट पाण्यात भिजवून ठेवा. यात थोडं मीठ टाकल्यास अधिक फायदा होतो.
लिंबाचा रस
कारल्यावर लिंबाचा रस पिळून २० मिनिटं ठेवा. लिंबाच्या आंबटपणामुळे कडूपणा कमी होतो आणि चवीत ताजेपणा येतो.
सिरका आणि साखर
कारलं थोडा वेळ सिरका आणि साखरेत मेरिनेट केल्यास त्याची चव संतुलित होते.
दह्यात मेरिनेट
कारलं ३० मिनिटं दह्यात ठेवल्यास ते मऊ होतं आणि लॅक्टिक अॅसिडमुळे कडूपणा आटोक्यात राहतो.
हलका उकळणे
थोडं मीठ घातलेल्या पाण्यात कारलं ५ मिनिटं उकळून घ्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे कडूपणा निघून जातो.
बीज काढून टाकणे
कारल्याची बिया आणि पांढरं गूदा सर्वाधिक कडू असतं. ते काढून टाकल्यास चवदारपणा वाढतो.
ताकामध्ये भिजवणे
कारलं ताकामध्ये भिजवल्यास त्याचा कडूपणा कमी होतो आणि ते पचायलाही हलकं पडतं.
हे सोपे आणि घरगुती उपाय करून तुम्ही कारल्याचा कडूपणा कमी करून ते चवदार बनवू शकता. त्यामुळे कारल्याचे अनगिनत आरोग्यदायी फायदे चाखताना त्याच्या कडूपणामुळे दूर राहावं लागणार नाही.
आता कारलं फक्त आरोग्यासाठी नव्हे तर चवीसाठीही आवडतं होईल!