फ्रिजमध्ये कणीक ठेवणे किती योग्य (फोटो सौजन्य - iStock)
जवळजवळ प्रत्येक शहरात आणि गावागावांमध्ये रेफ्रिजरेटर वापरले जातात. उन्हाळ्यात, पाणी आणि दूध यांसारखे थंड पेय खराब होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. बरेच लोक बाहेर ठेवल्यास खराब होऊ शकणाऱ्या इतर वस्तूदेखील साठवतात. बहुतेक लोक रेफ्रिजरेटरमध्ये उरलेले पीठ अर्थात कणीकदेखील साठवतात आणि दुसऱ्या दिवशी त्यापासून पोळ्या बनवतात.
पण कणीक अशा पद्धतीने ठेवणे आणि सकाळी उठून त्याच्या पोळ्या बनवणे योग्य आहे की नाही? आज, आम्ही तुम्हाला या लेखातून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली कणीक किती दिवसात विषारी होते आणि जर स्टोअर करायची असेल तर कशी करायची याबाबत योग्य माहिती देणार आहोत.
किती काळ सुरक्षित आहे?
रेफ्रिजरेटर घरी ठेवले जातात कारण त्यातील वस्तू योग्य पद्धतीने साठवून आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो आणि पदार्थ फेकून द्यावे लागत नाहीत. शिळे पदार्थही गरम करून खाता येतात. पण त्यालाही काही मर्यादा आहेत. जवळजवळ प्रत्येकजण मळलेले पीठ अर्थात कणीक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो, परंतु साठवण्याची पद्धत आणि वेळ जाणून घेणे महत्वाचे आहे.
जेव्हा तुम्ही कणीक भिजवता तेव्हा त्याच्या पुढील २४ तासांत रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेली कणीक वापरण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच, रात्रभर ठेवलेली कणीक ही दुसऱ्या रात्रीपर्यंत संपायलाच हवी. याव्यतिरिक्त, रेफ्रिजरेटरमधून कणीक काढून ताबडतोब पोळ्या बनवणे योग्य नाही. पोळी अर्थात चपाती लाटण्यापूर्वी कणीक थोडी साधी होऊ द्या. किमान१० ते १५ मिनिटे आधी बाहेर काढून ठेवा आणि मगच चपाती लाटा.
बर्फ घालून कणीक भिजवल्यास कशी होते चपाती? करून पाहाल तर हीच पद्धत तुफान म्हणाल
कणीक रेफ्रिजरेटरमध्ये कशी साठवायची?
फ्रिजमधील कणीक कधी विषारी बनते?
दोन किंवा तीन दिवसांनी कणीक वापरणे खूप धोकादायक असू शकते. तसंच ही कणीक आंबट होऊ शकते आणि कधीकधी धोकादायक बॅक्टेरियांना आश्रय देऊ शकते. त्यापासून बनवलेल्या चपाती खाल्ल्याने तुम्ही आणि तुमचे कुटुंब आजारी पडू शकता. काही प्रकरणांमध्ये, ते विषारीदेखील होऊ शकते. जर तुम्हाला कणीक जास्त काळ साठवायची असेल तर तुम्ही ते फ्रीजरमध्ये ठेवू शकता. पण तसे करणेदेखील आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. त्यामुळे २४ तासांच्या आत फ्रिजमधील कणीक वापरून संपवण्याचा प्रयत्न करावा.
1 महिना गव्हाच्या पिठाच्या चपाती न खाल्ल्यास काय होईल शरीरावर परिणाम? तज्ज्ञांचा खुलासा