Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oily Skin: ऑयली स्किनला म्हणा बाय-बाय! महागडे स्किनकेअर नको, फक्त करा ‘हा’ घरगुती उपाय

Tips For Oily Skin: चेहरा सतत तेलकट होतोय महागड्या स्किनकेअर प्रॉडक्ट्सऐवजी तांदळाच्या पिठाचा हा नैसर्गिक उपाय त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करून चेहऱ्याला देऊ शकतो नैसर्गिक ग्लो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 10, 2026 | 08:37 PM
Oily Skin: ऑयली स्किनला म्हणा बाय-बाय! महागडे स्किनकेअर नको, फक्त करा ‘हा’ घरगुती उपाय
Follow Us
Follow Us:
  • ऑयली स्किनला म्हणा बाय-बाय
  • महागडे स्किनकेअर नको
  • फक्त करा ‘हा’ घरगुती उपाय
उन्हाळ्यात आणि दमट हवामानात अनेकांना ऑयली स्किनची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. चेहरा सतत तेलकट दिसणे, चिकटपणा वाढणे आणि वारंवार पिंपल्स येणे यामुळे अनेकजण त्रस्त असतात. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक स्किन केअर प्रॉडक्ट्समध्ये केमिकल्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्ही काही घरगुती उपायांचा देखील वापर करु शकता. अशाच उपायांपैकी एक म्हणजे तांदळाचे पीठ. तांदळाच्या पिठामध्ये त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्याची क्षमता असते, ज्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ, तजेलदार आणि फ्रेश दिसू शकते. चला तर जाणून घेऊयात तेलकट त्वचेसाठी तांदळाचे पीठ कसो फायदेशीर आहे.

Voice Change: आवाजात अचानक बदल होतोय? दुर्लक्ष करु नका, शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत

तांदळाचे पीठ त्वचेसाठी कसे फायदेशीर?

तज्ज्ञांच्या मते, तांदळाच्या पिठामध्ये नैसर्गिक एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात. हे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. तसेच चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेतल्यामुळे त्वचा कमी चिकट दिसते. नियमित वापर केल्यास टॅनिंग कमी होते आणि नैसर्गिक ग्लो वाढू शकतो. परंतु, घरगुती उपाय नैसर्गिक असले तरी प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय नियमित वापरण्यापूर्वी त्वचेचा प्रकार समजून घेणे आणि आवश्यक असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

फेसपॅक कसा तयार करावा?

ऑयली स्किनसाठी तांदळाच्या पिठामध्ये गुलाबजल, दही किंवा कोरफडीचा जेल मिसळून फेसपॅक तयार केला जाऊ शकतो. हा पॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवून टाका. काही लोक त्यामध्ये मधाचाही वापर करतात. यामुळे त्वचेला थंडावा आणि मॉइश्चर मिळण्यास मदत होते.

योग्य आहाराचाही त्वचेवर होतो परिणाम

तज्ज्ञांच्या मते, ऑयली स्किन नियंत्रित ठेवण्यासाठी बाहेरील उपायांसोबतच योग्य आहार घेणेही महत्त्वाचे आहे. जास्त तेलकट, तळलेले आणि साखरयुक्त पदार्थ त्वचेतील तेलाचे प्रमाण वाढवू शकतात. त्यामुळे फळे, भाज्या आणि भरपूर पाणी यांचा आहारात समावेश केल्यास त्वचा अधिक निरोगी आणि तजेलदार राहण्यास मदत मिळू शकते.

कोणती काळजी घ्यावी?

  • फेसपॅक आठवड्यातून १ ते २ वेळाच वापरा.
  • संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करा.
  • फेसपॅक लावल्यानंतर मॉइश्चरायझर वापरणे विसरू नका.
  • चेहरा नियमित स्वच्छ ठेवा आणि पुरेसे पाणी प्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Hair Care Tips: हेअर स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंगमध्ये काय फरक? सुंदर आणि सिल्की केसांसाठी कोणती ट्रीटमेंट बेस्ट?

Web Title: Oily skin home remedies natural rice flour face pack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 08:37 PM

Topics:  

  • oily skin
  • skin care tips
  • skin problem

संबंधित बातम्या

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!
1

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Simple Home Hacks: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की पहा करून
2

Simple Home Hacks: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की पहा करून

Skin Care Tips: चेहऱ्यावरील वांग आणि काळ्या डागांमुळे हैराण झाला आहात? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, चेहऱ्यावर येईल ग्लो
3

Skin Care Tips: चेहऱ्यावरील वांग आणि काळ्या डागांमुळे हैराण झाला आहात? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, चेहऱ्यावर येईल ग्लो

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट
4

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.