Diabetes: प्री-डायबिटीज म्हणजे काय? मधुमेह होण्याआधी शरीर देतं ‘हे’ सायलेन्ट संकेत; वेळीच व्हा सावध
हेअर स्ट्रेटनिंग ही प्रक्रिया केस पूर्णपणे सरळ करण्यासाठी केली जाते. या ट्रीटमेंटमध्ये केमिकल्स आणि हीटचा वापर करून केसांचा नैसर्गिक टेक्स्चर बदलला जातो. कुरळे किंवा वेव्ही केस पूर्णपणे स्ट्रेट आणि शायनी दिसू लागतात. स्ट्रेटनिंगचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. मात्र या प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे काही वेळा केस कोरडे आणि कमकुवत होऊ शकतात.
हेअर स्मूथनिंगमध्ये केसांचा नॅचरल लूक कायम ठेवला जातो. या प्रक्रियेमुळे केस सॉफ्ट, सिल्की आणि कमी फ्रिझी दिसतात. स्मूथनिंगमध्ये स्ट्रेटनिंगच्या तुलनेत कमी केमिकल्स वापरले जातात. त्यामुळे केसांचे नुकसान कमी होते. नैसर्गिक आणि सॉफ्ट लूक हवा असल्यास स्मूथनिंग हा अधिक चांगला पर्याय मानला जातो.
तज्ज्ञांच्या मते, ज्यांना पूर्णपणे सरळ केस हवे आहेत त्यांनी स्ट्रेटनिंगचा पर्याय निवडू शकतात. मात्र नैसर्गिक लूक, कमी नुकसान आणि सॉफ्ट टेक्स्चर हवे असल्यास स्मूथनिंग अधिक योग्य ठरते. केसांचा प्रकार, गुणवत्ता आणि स्काल्पची स्थिती लक्षात घेऊनच ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांच्या मते, हेअर स्ट्रेटनिंग किंवा स्मूथनिंग करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. काही लोकांना वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे अॅलर्जी, खाज किंवा स्काल्पवर जळजळ होऊ शकते. त्यामुळे कोणतीही ट्रीटमेंट करण्यापूर्वी अनुभवी हेअर एक्सपर्टचा सल्ला घेणे आणि केसांची स्थिती तपासणे अत्यंत गरजेचे मानले जाते.
Relationship Tips: रागाच्या भरातही जोडीदाराला बोलू नका ‘या’ गोष्टी; नातं तुटू शकतं






