Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! वर्षानुवर्षे वापरलेली जुनी उशी ठरते आजरांचे माहेरघर; वेळेवर बदला नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

Pillow Tips : झोपेसाठी वापरली जाणारी उशी, आपल्या आरोग्यासाठी धोक्याचे कारण बनू शकते. उशीच्या टाईपनुसार तिला काही वर्षांनंतर बदलण्याची वेळ असते यावेळेत जर तिला बदललं नाही तर त्याचा वापर अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 15, 2026 | 08:15 PM
सावधान! वर्षानुवर्षे वापरलेली जुनी उशी ठरते आजरांचे माहेरघर; वेळेवर बदला नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सावधान! वर्षानुवर्षे वापरलेली जुनी उशी ठरते आजरांचे माहेरघर; वेळेवर बदला नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

Follow Us
Follow Us:
  • जुनी उशी मानेचा त्रास, डोकेदुखी आणि चुकीची झोप यास कारणीभूत ठरू शकते.
  • उशीमध्ये धूळ, घाम आणि मृत त्वचा साचल्याने ॲलर्जी व श्वसनाचे आजार वाढू शकतात.
  • साधारण २-३ वर्षांनी उशी बदलणे गरजेचे असून मटेरियलनुसार तिचे आयुष्य वेगवेगळे असते.
बदलत्या जीवनशैलीत आजाराचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत आहे. यासाठी कारणीभूत फक्त वातावरणातील बदल नाही तर आपल्या आयुष्यातील काही शुल्लक चुका देखील आहेत. रोजच्या जीवनात वापरत असलेल्या अनेक गोष्टी आजारांचा धोका घेऊन तुमच्याशी गळाभेट करत असतात. यातीलच एक म्हणजे तुमची रोज वापरत असलेली उशी. झोपण्यासाठी अधिकतर याचा वापर केला जातो. प्रत्येकाच्या घरी उशी असते आणि तिचा नियमित वापर देखील केला जातो. पण हिच उशी तुमच्यासाठी आजारपण घेऊन येत असते हे तुम्हाला माहिती आहे का? आता विचार करा, तुमच्या घरातील उशी ही किती जुनी आहे… उत्तर नक्कीच अनेक वर्षांच मिळेल. आपल्या घरात वर्षानुवर्षे जुनी उशी आपण वापरतो कारण ती खराब झाली नाही किंवा फाटली नाही या विचाराने… पण तुम्हाला उशी बदलण्याची योग्य वेळ कोणती ते ठाऊक आहे का? चला या प्रश्नांमागचं उत्तर आणि त्यामागचं गांभीर्य जाणून घेऊया.

धोक्याची घंटा! जगात १.३ अब्ज लोक देत आहेत या आजाराला झुंज, वेळीच उपाय केले नाही तर संकट वाढणार; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

उशी बदलण्याची कारणे

पाठीचा कणा ठेवते सरळ

चुकीच्या आकाराची उशी तुमच्या मानेचं किंवा डोक्याचं हाडं बिघडवू शकते. यामुळे सकाळी डोकेदुखी होणे किंवा थकवा जाणवणे अशा समस्या उद्भवू लागतात. योग्य आधार असलेल्या उशीचा वापर केल्यास ती पाठीला सरळ रेषेत ठवते.

ॲलर्जीचा त्रास

तुम्ही नियमितपणे तुमच्या घरातील उशी स्वच्छ करत असाल पण तरीही त्यावर काही प्रमाणात धूळ, मृत त्वचा आणि घाम साचलेला असतो. यामुळे दमा, छातीत वेदना होणे आणि डोळ्यांमध्ये जळजळ निर्माण होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

झोपेसाठी मदत

तुम्ही जर वेळोवेळी उशी बदलली आणि चांगली उशी खरेदी केली तर त्याचा तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. योग्य आधार देणारी उशी निवडल्याने तुम्हाला अधिक आरामदायी झोप लागण्यास आणि झोपेत कुशी बदलण्यापासून रोखण्यास मदत होते.

आई-बाबा बनण्यात अडचण? इनफर्टिलिटीवर मात करण्यासाठी ही 6 ‘कपल योगासने’ ठरतील रामबाण उपाय

उशी बदलण्याची योग्य वेळ कोणती?

साधारण प्रत्येक उशीला दर दोन ते तीन वर्षांनी बदलले पाहिजे. बऱ्याचदा उशीच्या मटेरियलवर आणि काळजीवर अवलंबून असते. मटेरियलनुसार, उशीचे आयुष्यमान खालीलप्रमाणे असते:

पॉलिस्टर किंवा फायबरफिल: या उशा लवकर खराब होण्याची शक्यता असते. या उशा तुमच्या घरात असल्यास दर १२-१८ महिन्यांनी त्यांना बदलणे उत्तम ठरेल. जास्त काळ यांचा वापर केल्याने आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.

मेमरी फोम: या उशा दिर्घकाळ चांगल्या टिकून राहू शकतात. ज्यामुळे ३-४ वर्षे तुम्ही आरामात यांचा वापर करु शकता.

लेटेक्स: ही उशी सर्वात टिकाऊ मानली जाते. ती ३-४ वर्षांनंतरही खराब होत नाही. पण उशीची वेळोवेळी स्वच्छता करणेही गरजेचे आहे हे लक्षात ठेवा.

हे देखील लक्षात ठेवा की, सर्व उशा या धुण्यायोग्य नसतात. बहुतेक उशा या धुण्याच्या पर्यायासह येतात पण मेमरी फोम आणि लेटेक्सच्या उशा सहसा पूर्णपणे धुण्यासाठी नाही तर फक्त डाग काढण्यासाठीच असतात.

Web Title: Old pillow health risk when to change pillow lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत
1

Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Ear Care: सावधान! कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक
2

Ear Care: सावधान! कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक

Child Health: दप्तरांच्या ओझ्याने वाकली शाळकरी मुलं, मणक्याच्या समस्या; काय सांगतात तज्ज्ञ
3

Child Health: दप्तरांच्या ओझ्याने वाकली शाळकरी मुलं, मणक्याच्या समस्या; काय सांगतात तज्ज्ञ

Lancet Study: भारतासाठी महत्त्वपूर्ण निरीक्षण, न्यूझीलंडमध्ये सुरक्षित पर्यायांमुळे धूम्रपानाचे प्रमाण 40% वरून 7% पर्यंत घटले
4

Lancet Study: भारतासाठी महत्त्वपूर्ण निरीक्षण, न्यूझीलंडमध्ये सुरक्षित पर्यायांमुळे धूम्रपानाचे प्रमाण 40% वरून 7% पर्यंत घटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.