Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी

ओमानमधील एकेकाळी गजबजलेलं गाव आज मात्र पूर्णपणे ओसाड झालं आहे. शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या या गावात फिरताना भारतीय यूट्यूबरला जुन्या घरांपासून ते तेथील अनोख्या जीवनशैलीपर्यंत अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 03, 2026 | 08:16 AM
Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी

Follow Us
Follow Us:
  • एकेकाळी हजारो लोकांची वस्ती असलेल्या या गावातून कालांतराने नागरिकांनी स्थलांतर केलं.
  • जुन्या घरांची पडझड आणि निर्मनुष्य गल्ल्या पाहून गावाचा बदललेला चेहरा समोर आला.
  • घरांमध्ये आढळलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण रचनांमागे तत्कालीन जीवनशैलीशी संबंधित कारणं होती.
आज आम्ही तुम्हाला पश्चिम आशियातील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकाला वसलेल्या ओमान या ठिकाणाविषयीची माहिती सांगत आहोत. एक काळ होता जेव्हा या ठिकाणी हजारो लोकांची वसाहत होती पण आता मात्र हे ठिकाण निर्जन बनले आहे. भारतीय यूट्यूबर अनमोल जायसवाल ज्याला सोशल मिडियावर Indian Backpacker च्या नावाने ओळखले जाते, याने आपल्या सहलीदरम्यान अल हमरा ओल्ड विलेज (Al Hamra Old Village) दाैरा केला.

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या

४०० ते ६०० वर्षे जुने गाव

अल हमरा ओल्ड विलेज हा ४०० ते ६०० वर्षे जुने असल्याचे म्हटले जाते. अनमोलने आपल्या व्हिडिओत सांगितले की, एकेकाळी इथे लोकांची भरपूर गर्दी पाहायला मिळत होती पण वेळेसोबतच लोक जुन्या घरांना सोडून आधुनिक शहरांत स्थलांतरण करु लागले. गावं रिकामं होण्याचे आणखी एक कारण म्हणजे आधुनिक सुविधांची कमतरता. पाणी आणि विजेसारख्या सामान्य सुविधा पूर्वी इथे चांगल्या नव्हत्या. नंतर विजेची सुविधा आल्यानंतरही नव्या पिढीने आधुनिक घरांमध्ये राहणेच पसंत केले. अनमोलला गाईडने सांगितले की, १९९७ च्या आसपास हे गाव रिकामे होऊ लागले. विज याच्या बऱ्याच आधी म्हणजे १९९३ मध्येच गावात आली होती पण लोक हळूहळू दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होऊ लागले.

मोडकळीला आलेली घरे…

अनमोलने सांगितले की, दिवसा जेव्हा तो गावात फेरफटका मारत होता तेव्हा त्याला काहीशी भितीदायक व्हाईब आली. चारही बाजूला घरे आणि निर्जन गल्ल्या होत्या. अनेक घरांच्या भिंतींमध्ये छिद्र झाले होते तर काही घरांचे छप्पर पूर्णपणे तुटायला आले होते. तथापि, ही परिस्थिती कोणत्या युद्धामुळे नाही तर लोक या ठिकाणाला सोडून गेले म्हणून निर्माण झाली. गाव रिकामे पडले आणि बदलत्या वातावरणानुसार वेळेअभावी घरे खराब होण्यास सुरुवात झाली.

जुन्या ओमानी घरात Living Museum

अल हमरा येथे अनमोलने Bait Al Safa Museum देखील पाहिले. हे म्यूजियम एका जुन्या ओमानी घरात बांधण्यात आले आहे. यात साधारण ४०० वर्षे जुन्या घराची बनावट आणि ओमानच्या जुन्या जीवनशैलीला जवळून पाहता येते.

जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

महिलांसाठी Serving Window

जुन्या ओमानी घरांमध्ये अनमोलला एक फार मोठी खिडकी दिसली ज्याने त्याचे लक्ष वेधले. गाइडने याविषयी स्पष्ट केले की, जुन्या काळात घरी पाहुणे आले की, घरातील महिला या खिडकीतू जेवण त्यांच्यापर्यंत पोहचवायचे. त्यांना जेवण बनवून या खिडकीत ठेवावे लागायचे आणि मग इथून ते मेन डायनिंगपर्यंत पोहचवले जायचे. अशा प्रकारे घरातील स्त्रियांची गोपनीयता जपली जात असे.

 

Web Title: Oman al hamra old village 400 600 years history indian backpacker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
1

जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय
2

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या
3

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू
4

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.