“कोकण म्हणजे सौंदर्याची खाण! ज्या मातीला निसर्ग भरभरून दिलंय देवान, जिथे जात हरपते भान पण रात्रीच्या प्रहरी काळोखाला येतो उधाण” अशीच एक नवीन कथा, तुमच्यासमोर हाजीर आहे. ही घटना भुताटकीच्या संबंधित असली तरी काही तरी वेगळं यामध्ये वाचायला मिळणार आहे. चला तर मग वाचूयात:
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पाट नावाचे गाव आहे. गाव तसे सुंदर! पण शेवटी कोकणाचाच भाग! २०व्या शतकात घडलेली ही घटना आहे. त्याकाळी वीज नव्हती. गावातील मुहल्ल्यात राहणारा इस्माईल बुरोंडकर अनेक वर्षांनी मुंबईहून गावी परतत होता. रात्रीचे दीड वाजले होते. गावात रस्त्यावर वीज वैगेरे काही नव्हती. इस्माईल तसा शरीरवृष्टीने पैलवान! त्याला त्याच्या शरीराचा माजही भरपूर होता. गावात त्याने अधिपत्यच गावजले होते. एकेरात्री मुंबईहून परतत असताना त्याला दुरावरच एक विकृती उभी दिसली. इस्माईलला त्याच्या बॉडीचा माज होता. तो घाबरला नाही. तो चालत चालत त्या विकृतीच्या जवळ गेला. ती भयानक आकृती फार विचित्र दिसत होती. इस्माईलने त्याला पाहिले आणि रस्ता सोडायला सांगितला. ती भयानक आकृती काही रस्ता सोडायला तयार नव्हती.
इस्माईलने पुन्हा त्याला सांगितले की, “माझा रस्ता सोड.” ते भूत काही जागेवरून हलण्याचे नाव घेत नव्हते. तेव्हा इस्माईल त्या भुताला चॅलेन्ज देतो. तो त्याच्याशी पैज लावत म्हणतो की, “ठीके, तू असा काही बाजूला हटणार नाहीस. चल मग माझ्याशी एक कुस्तीचा डाव खेळ. पण एका अटीवर, तुला तुझ्या जादूचा उपयोग टाळावा लागेल.” ते भूत त्याला होकार देतो. या दोघांमध्ये त्या काळोख्या रात्री भर रस्त्यातच कुस्ती रंगते. भूत एकदाही जादूचा उपयोग करत नाही. पण याचा फायदा इस्माईलला होत असतो. इस्माईल त्या भुताला डावपेचीत चारी मुंड्या चीत करत असतो. भूत हरत असतो. पण शेवटी भुताला हार असह्य होते आणि तो त्याच्या शक्तीचा वापर करतोच. ती रात्र इस्माईलची शेवटची रात्र ठरते.
सकाळी मुहल्यातील मुलं वाटेवरून शाळेत जात असताना. रस्त्याच्या कडेला एका झाडावर इस्माईलचे मृतशव लटकलेले दिसते. तो मेलेला असतो. पण त्याची आत्मा अजूनही तेथील लोकांना दिसते असा दावा स्थानिक ग्रामस्थांचा आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.