रतन टाटा यांचा पालकांना सल्ला
टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांनी 09 ऑक्टोबर रोजी जगाचा निरोप घेतला आहे. रतन टाटा हे एक प्रामाणिक, नैतिक आणि परोपकारी व्यक्ती होते. जीवनात अनेक अडचणींचा सामना करून त्यांनी यश संपादन केले. त्यांनी कधीच लग्न केले नाही, पण पालकत्वाच्या बाबतीत त्यांचा अनुभव हा वाखाणण्याजोगा होता. कारण त्यांनी अनेक मुलांसाठी अविरत काम केले होते.
आज प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना उत्तम शिक्षण द्यायचे असते. भरपूर पैसा मिळवणे आणि श्रीमंत होणे हाच त्यामागचा हेतू आहे. अशा पालकांमध्ये तुमचाही समावेश असेल, तर आज आम्ही तुम्हाला रतन टाटा यांनी दिलेल्या Parenting Tips ची आठवण करून देत आहोत, ज्या प्रत्येक पालकांसाठी उपयुक्त आहेत. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/iStock)
मुलांना पैशाने श्रीमंत होण्यासाठी शिकवू नका
पैसे कमावण्याच्या हेतूने शिक्षण देणे योग्य नाही
रतन टाटा यांचा प्रत्येक पालकांना सल्ला होता की त्यांनी आपल्या मुलांना श्रीमंत होण्यासाठी नव्हे तर आनंदी राहण्यासाठी उत्तम शिक्षण द्यावे. अशी शिकवण असेल तर जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांना वस्तूंचे महत्त्व कळेल, किंमत नाही. पैशामागे धावण्यापेक्षा त्यांना वस्तूंचे महत्व कळेल, शिक्षणाचे आणि अन्य गोष्टींचे महत्त्व कळल्यानंतर आपोआप श्रीमंती मिळेल.
हेदेखील वाचा – Parenting Tips: तुमची मुलं होतील अधिक युनिक, पालकांनी फॉलो करा या टिप्स
योग्य निर्णय घेण्यासाठी खूप वेळ घालवू नका
जो निर्णय घ्याल तो तडीला न्यायला शिकवा
रतन टाटा हे एक उत्तम उद्योगपती होते. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा, असे मानले जाते. पण रतन टाटांनी कधीही योग्य निर्णय घेण्यात वेळ वाया घालवला नाही. उलट निर्णय आधी घ्यायचा आणि मग तो योग्य ठरवायचा ही त्यांची नीती होती. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना झटपट निर्णय घेण्यास शिकवावे आणि ते योग्य कसे करायचे ते सांगावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
संधी शोधायला शिकवा
संधी शोधायची गरज मुलांना शिकवा
टाटा यांच्या मते, आपल्या सर्वांमध्ये एकसारखी प्रतिभा नसते. प्रत्येक मूल अथवा प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. परंतु प्रत्येकाला त्यांची प्रतिभा विकसित करण्याच्या समान संधी आहेत. त्यामुळे मुलांना संधी शोधायला शिकवा, जेणेकरून त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळेल. ती संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं कसं करता येईल याबाबत त्यांना शिकवण द्यावी
हेदेखील वाचा – विभक्त कुटुंबात मुलांचे पालन करणे नाही सोपे, नात्यात येतात अशा अडचणी
आयुष्यातील चढउताराचा योग्य सामना
आयुष्यातील चढउताराचा सामना कसा करावा हे शिकवा
मुलांचे मार्क कमी आल्यावर किंवा काही घटना घडल्यावर त्यांची आशा सुटते आणि निराशाही येते. रतन टाटा यांनी अशा मुलांच्या पालकांना असा सल्ला दिला होता की जीवन सुरळीत चालू ठेवण्यासाठी चढ-उतार आवश्यक आहेत. कारण सरळ जीवन जगणे म्हणजे ECG वर सरळ रेषा येण्यासारखेच आहे, ज्याचा अर्थ आपण जिवंत नाही आणि त्या आयुष्याला काहीच अर्थ नाही.
दोन दगडांवर पाय नको
एकाच क्षेत्रात तज्ज्ञ बनवा
रतन टाटा नेहमी म्हणायचे की मुलांनी त्यांच्या क्षमतांचा वापर फक्त एकाच क्षेत्रात केला पाहिजे. आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात सक्रिय ठेवू इच्छिणाऱ्या पालकांचे नेहमीच नुकसान होते. त्यामुळे मुलांना दोन दगडांवर पाय देऊन उभं राहायला लावण्यापेक्षा त्यांना एकाच क्षेत्रातील तज्ज्ञ बनवणे गरजेचे आहे आणि ही जबाबदारी पालकांची आहे.