Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१५ मिनिटांत चेहऱ्यावर येईल पार्लरसारखा इंस्टंट ग्लो! ‘या’ पद्धतीने करा मसूर डाळीचा वापर, डेड स्किन होईल गायब

चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन घालवण्यासाठी मसूर डाळीच्या फेसपॅकचा वापर करावा. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करतात आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 22, 2026 | 09:05 AM
१५ मिनिटांत चेहऱ्यावर येईल पार्लरसारखा इंस्टंट ग्लो! 'या' पद्धतीने करा मसूर डाळीचा वापर, डेड स्किन होईल गायब

१५ मिनिटांत चेहऱ्यावर येईल पार्लरसारखा इंस्टंट ग्लो! 'या' पद्धतीने करा मसूर डाळीचा वापर, डेड स्किन होईल गायब

Follow Us
Follow Us:

प्रत्येकालाच सुंदर आणि डागविरहित त्वचा कायमच हवी असते. चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. फेसमास्क, फेसपॅक, स्किन बोटॉक्स, फेशिअल इत्यादी अनेक गोष्टी करून घेतल्या जातात. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे, धूळ. माती, प्रदूषण आणि दीर्घकाळ उन्हात राहिल्यामुळे चेहऱ्यावर डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर जमा झालेली डेड त्वचेचे सौंदर्य खराब करून टाकते. कितीही सुंदर मेकअप केल्यानंतर सुद्धा त्वचा निस्तेजच वाटते. त्वचा काळी दिसू लागल्यानंतर ती उजळदार करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा आणि हानिकारक क्रीमचा वापर करतात. पण याचा तात्पुरता परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. काहीकाळ त्वचा खूप जास्त जास्त सुंदर दिसते, पण पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)

पांढऱ्याशुभ्र आणि तुकतुकीत त्वचेसाठी घरीच तयार करा तांदळाचा साबण, कोरियन महिलांप्रमाणे चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर वारंवार केमिकल ट्रीटमेंट किंवा महागड्या स्किन प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेचे सौंदर्य दीर्घकाळ टिकून राहते. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ त्वचेसाठी वरदान ठरतात. यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो आणि चेहरा आतून स्वच्छ होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला मसूर डाळीचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला फेसपॅक त्वचेवर लावल्यास चेहरा अधिक खुलून दिसेल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

मसूर डाळ फेसपॅक बनवण्याची कृती:

मसूर डाळीमध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करतात. यासाठी मिक्सरच्या भांड्यात मसूर डाळ घेऊन बारीक वाटून पावडर तयार करा. तयार केलेली पावडर तुम्ही पुन्हा वापरू शकता. मसूर डाळीच्या पावडरमध्ये दही मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.५ मिनिटं मसाज केल्यामुळे त्वचेच्या वाढलेल्या समस्यांपासून आराम मिळेल आणि डेड स्किन कमी होईल. त्यानंतर १० मिनिटं त्वचा अशीच ठेवून पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होईल आणि त्वचा अतिशय सुंदर दिसेल.

तरुण वयात चेहऱ्यावर आलेले पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स होतील कायमचे गायब! चिमूटभर जेष्ठमधाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

उन्हामुळे काळा झालेला चेहरा आतून स्वच्छ करण्यासाठी वाटीमध्ये मसूर डाळीची पावडर घेऊन त्यात लिंबाचा रस मिक्स करा. तसेच त्यात चिमूटभर हळद सुद्धा टाकावी. फेसपॅक तयार झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा आणि नंतर हलक्या हाताने मसाज करून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. लिंबाच्या रसात असलेले नॅचरल ब्लीचिंग एजंट चेहऱ्यावर जमा झालेले डाग कमी करण्यास मदत करतात. तर हळदीमध्ये असलेले घटक त्वचा आतून स्वच्छ करतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो वाढवतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Parlor like instant glow will appear on the face in 15 minutes use lentil pulse in this way dead skin will disappear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

Oily Skin: ऑयली स्किनला म्हणा बाय-बाय! महागडे स्किनकेअर नको, फक्त करा ‘हा’ घरगुती उपाय
1

Oily Skin: ऑयली स्किनला म्हणा बाय-बाय! महागडे स्किनकेअर नको, फक्त करा ‘हा’ घरगुती उपाय

७ दिवसांमध्ये चेहरा होईल डागविरहित! रोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा होममेड जेष्ठमध क्रीम, त्वचा होईल उजळदार
2

७ दिवसांमध्ये चेहरा होईल डागविरहित! रोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा होममेड जेष्ठमध क्रीम, त्वचा होईल उजळदार

पाणी पिऊन सुद्धा उचकी थांबत नाही? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास काही मिनिटांमध्ये उचक्या होतील बंद, मिळेल तात्काळ आराम
3

पाणी पिऊन सुद्धा उचकी थांबत नाही? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास काही मिनिटांमध्ये उचक्या होतील बंद, मिळेल तात्काळ आराम

चेहऱ्यावर साचून राहिलेल्या घाणीमुळे त्वचा टॅन दिसते? मग ‘या’ साली पाण्यात मिक्स करून घ्या वाफ, त्वचेची छिद्र होतील स्वच्छ
4

चेहऱ्यावर साचून राहिलेल्या घाणीमुळे त्वचा टॅन दिसते? मग ‘या’ साली पाण्यात मिक्स करून घ्या वाफ, त्वचेची छिद्र होतील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.