पांढऱ्याशुभ्र आणि तुकतुकीत त्वचेसाठी घरीच तयार करा तांदळाचा साबण, कोरियन महिलांप्रमाणे चेहरा- शरीरावर येईल चमकदार ग्लो
वाढत्या उन्हाळ्यात शरीरसोबतच त्वचा आणि केसांची खूप जास्त काळजी घेतली जाते. उन्हात गेल्यानंतर चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग, पिंपल्स, रखरखीत त्वचा, कोरडे केस इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. उन्हामुळे चेहऱ्यावरील चमक कमी झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या महागड्या बॉडी वॉश किंवा इतर स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात आणि चेहऱ्यावरील ओलावा कमी होऊन जातो. सर्वच महिलांना चेहऱ्यावर कोरियन महिलांप्रमाणे चमकदार ग्लो हवा असतो. त्यामुळे सतत काहींना काही केले जाते. पण चुकीचे स्किन केअर किंवा वारंवार केलेल्या महागड्या प्रॉडक्टच्या वापरामुळे त्वचेला हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)
उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट न करता घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरातील तांदळाचा वापर करून होममेड साबण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तांदळापासून बनवलेला साबण चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करून त्वचा हायड्रेट आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करतो. चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिंपल्स आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी तांदळाच्या साबणाचा वापर करावा. हा साबण त्वचा खोलवर मॉइश्चराईज करण्यास मदत करतो. चला तर जाणून घेऊया साबण बनवण्याची कृती.
तांदळाच्या साबणाचा नियमित वापर केल्यास चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होण्यासोबतच त्वचा उजळदार आणि ग्लोइंग दिसेल. यामध्ये असलेले कच्चे दूध, बटाट्याचा रस चेहऱ्यावर जमा झालेल्या मृत पेशी कमी करण्यासाठी मदत करतात. उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी तांदळाच्या साबणाचा वापर करावा. दुधामध्ये असलेले गुणकारी घटक सैल झालेली त्वचा घट्ट करून चेहऱ्यावरील तारुण्य वाढवतात. दोन ते तीन आठवडे साबणाचा नियमित वापर केल्यास फरक दिसून येईल.






