पुणे : पेपे जीन्स लंडन, यूके स्थित डेनिम परिधान कंपनी, पिढ्यानपिढ्या भारतीयांची निवड आहे. आता कंपनीने भारतीय बाजारपेठेसाठी आपली पहिली टीव्ही जाहिरात लाँच करून भारतीयांशी आपले नाते अधिक दृढ केले आहे.
‘टाइम टू शाइन’ असे या जाहिरातीचे शीर्षक आहे. डेनिम जीन्स आणि विशिष्ट जीवनशैली पसंत करणाऱ्या लोकांना आकर्षित करण्यासाठी ही मोहीम आहे. मोहिमेमध्ये पेपे जीन्सकडून हिवाळी २०२२ संग्रह प्रदर्शित केला जाईल.
लंडनच्या प्रसिद्ध पोर्टबॅलो स्ट्रीटमध्ये १९७३ मध्ये आयकॉनिक ग्लोबल ब्रँडचा जन्म झाला. हे १९८९ पासून भारतीयांच्या हृदयात बसलेले आहे. ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे आणि मोठ्या बाजारपेठेतील हिस्सा मिळवणे आणि ग्राहकांच्या नवीन पिढीला आकर्षित करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.
टाईम टू शाइन जाहिरातीची निर्मिती बार्सिलोना-आधारित क्रिएटिव्ह प्रोडक्शन कंपनी कॅनडाद्वारे केली, जी आंतरराष्ट्रीय संगीत कार्यक्रमांचे आयोजन देखील करते. नूरने या जाहिरातीचे दिग्दर्शन केले आहे. टाईम टू शाइन आपल्याला जाहिरातीत सांगतो की, हीच वेळ आहे जेव्हा आपण स्वतःला जगासमोर सर्वोत्तम मार्गाने सादर करू आणि आपली स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करू. आम्हाला यश मिळवायचे आहे आणि आम्हाला कोणीही रोखू शकत नाही हे जगाला दाखवण्याची हीच वेळ आहे. चमकण्याची वेळ आली आहे, जगाला दाखवण्याची वेळ आली आहे. हे या जाहिरातीत दारवले आहे.
यासाठी पेपे जीन्सने सोशल मीडियावर आपली प्रसिद्धीही वाढवली आहे. याशिवाय कंपनीने आपल्या मोहिमेत अनेक प्रभावशाली व्यक्तींचा समावेश केला आहे. यामध्ये १६ सेलिब्रिटींचा समावेश आहे. ज्यात सिद्धांत चतुर्वेदी, गुरु रंधावा, अपारशक्ती खुराना, उमरान मलिक आणि रफ्तार इत्यादींचा समावेश आहे.






