मुंबईत माघी गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. चिंचपोकळी आणि लालबाग परिसरातील मूर्तिकारांच्या कामांना वेग आला असून गणेशमूर्ती घडवण्याची लगबग सुरू आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरा होणारा हा उत्सव गणपतीचा जन्मदिवस मानला जातो. माघी गणेशोत्सवात बाप्पाच्या पूजेला विशेष महत्त्व असून भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.