Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Perfume Side Effects: अतिप्रमाणात परफ्यूम वापरताय? मग सावधान! शरीरावर होऊ शकतात ‘हे’ परिणाम

Perfme Side effects On Health: परफ्यूम हा फ्रेश वाटण्यासाठी मदत करत असला तरी त्यातील काही रासायनिक घटक संवेदनशील त्वचा आणि श्वसनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींना त्रासदायक ठरू शकतात. जास्त प्रमाणात परफ्यूम लावल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 30, 2026 | 05:09 PM
Perfume Side Effects: अतिप्रमाणात परफ्यूम वापरताय? मग सावधान! शरीरावर होऊ शकतात ‘हे’ परिणाम
Follow Us
Follow Us:
  • अतिप्रमाणात परफ्यूम वापरताय?
  • शरीरावर होऊ शकतात ‘हे’ परिणाम
  • परफ्यूम वापरताना घ्या ही काळजी
सुगंधी परफ्यूम हा आजकालच्या लाइफस्टाइलचा भाग झाला आहे. स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी किंवा शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी परफ्यूमचा वापर केला जातो. मात्र, प्रत्येक परफ्यूम सर्वांसाठी सुरक्षित असेलच असे नाही. विशेषतः सेसिंटिव्ह स्कीन किंवा श्वसनाशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींना काही परफ्यूममधील रासायनिक घटकांमुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे परफ्यूमचा वापर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. परफ्यूममुळे आरोग्यावर कसा परिणाम होतो, जाणून घ्या.

Eating Schedule: सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत… जेवणाची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

त्वचेवर होऊ शकते अॅलर्जी

काही परफ्यूममध्ये असलेले सुगंधी रसायने त्वचेवर लालसरपणा, खाज, जळजळ किंवा पुरळ निर्माण करू शकतात. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी नवीन परफ्यूम वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करून पाहणे अधिक महत्वाचे आहे.

श्वसनाच्या तक्रारी वाढण्याची शक्यता

तीव्र सुगंधामुळे काही व्यक्तींना शिंका येणे, नाक बंद होणे, घशात खवखव किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो. दमा किंवा अॅलर्जीचा त्रास असलेल्या लोकांमध्ये तीव्र सुगंधामुळे लक्षणे वाढू शकतात.

डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास

काही लोकांना तीव्र सुगंधामुळे डोकेदुखी, मळमळ किंवा चक्कर येण्याचा अनुभव येऊ शकतो. बंद जागेत मोठ्या प्रमाणात परफ्यूमचा वापर केल्यास हा त्रास अधिक जाणवू शकतो.

 हानिकारक रासायनिक घटक?

अनेक सुगंधी उत्पादनांमध्ये अस्थिर सेंद्रिय संयुगे (VOCs) आणि इतर रासायनिक घटक असू शकतात. हे घटक प्रत्येक व्यक्तीवर सारखाच परिणाम करतात असे नाही, परंतु संवेदनशील व्यक्तींमध्ये त्रास होण्याची शक्यता वाढू शकते. या घटकांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत अजूनही संशोधन सुरू आहे.

लहान मुलांमध्ये आणि गर्भवती महिलांनी घ्यावी विशेष काळजी

लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासमोर अतिशय तीव्र सुगंधाचे परफ्यूम वापरणे टाळावे. अशा व्यक्तींमध्ये तीव्र वासामुळे अस्वस्थता, मळमळ, डोकेदुखी किंवा श्वसनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. त्यामुळे सौम्य सुगंधाची प्रोडक्ट्स अधिक सुरक्षित मानले जाते.

परफ्यूम वापरताना घ्या ही काळजी

  • परफ्यूमचा मर्यादित प्रमाणात वापर करा.
  • त्वचेवर अॅलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • डोळे, जखम किंवा अतिसंवेदनशील त्वचेवर परफ्यूम फवारणे टाळा.
  • हवेशीर ठिकाणी परफ्यूम वापरणे अधिक योग्य ठरते.
  • नवीन परफ्यूम वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे फायदेशीर ठरू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Girls Fear Lizards:  मोठमोठ्या संकटांना न घाबरणाऱ्या मुली पाल पाहताच का किंचाळतात? यामागे आहे ‘हे’ वैज्ञानिक कारण

Web Title: Perfume health risks side effects skin allergy respiratory problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • perfume
  • side effect

संबंधित बातम्या

सतत थकवा आणि श्वास घ्याल त्रास होतोय? क्रॉनिक फटीग सिंड्रोमच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार
1

सतत थकवा आणि श्वास घ्याल त्रास होतोय? क्रॉनिक फटीग सिंड्रोमच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार

पेरिमेनोपॉजच्या टप्प्यात महिलांमध्ये अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका अधिक का असतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती
2

पेरिमेनोपॉजच्या टप्प्यात महिलांमध्ये अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका अधिक का असतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती

मधुमेहापासून ते अगदी वाढलेले वजन कमी करण्यापर्यंत दालचिनी ठरेल खूप जास्त गुणकारी, जाणून घ्या फायदे
3

मधुमेहापासून ते अगदी वाढलेले वजन कमी करण्यापर्यंत दालचिनी ठरेल खूप जास्त गुणकारी, जाणून घ्या फायदे

रात्री झोपेमध्ये तोंडातून लाळ कशामुळे गळते? ॲसिडिटी की आतड्यांसंबंधित आजार, ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
4

रात्री झोपेमध्ये तोंडातून लाळ कशामुळे गळते? ॲसिडिटी की आतड्यांसंबंधित आजार, ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.