सर्दी खोकला होऊ नये म्हणून काय खावे
वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सातत्याने होणारे बदल, अपुरी झोप, सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्य लगेच बिघडून जाते. नाक, घसा खवखवणे आणि खोकला इत्यादी समस्या उद्भवू लागतात. शिवाय ताप किंवा सर्दी झाल्यानंतर अंगदुखी, नाकातून सतत पाणी येणे, घसा खवखवणे, नाक चोंदणे इत्यादी अनेक समस्या उद्भवल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घ्यावी. मुंबईसह इतर सर्वच ठिकाणी हवामानात सतत बदल होत असतात. या बदलांचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेतात. मात्र त्याचा फारसा फायदा शरीरावर होत नाही. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे सतत आरोग्य बिघडून जाते. सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर गोळ्या औषध घेण्यापेक्षा स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करून चाटण तयार करावे. यामुळे सर्दी खोकला कमी होऊन आराम मिळेल. आज आम्ही तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर सगळ्यात आधी गरम पाण्याची वाफ घ्यावी. वाफ घेतल्यामुळे सर्दी कमी होते. वाफ घेतल्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल. वाफ घेताना गरम पाण्यात झाडाचे तेल, निलगिरीचे तेल, लेमनग्रास तेल, लवंग तेल इत्यादी गोष्टी टाकून तुम्ही वाफ घेऊ शकता. किंवा साध्या गरम पाण्याची वाफ घेतली तरीसुद्धा सर्दीपासून आराम मिळेल.
आल्यामधले असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. आल्याच्या चहाचे किंवा आल्याच्या रसाचे सेवन केल्यास सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल आणि शरीर निरोगी राहील. आल्याच्या रसाच्या सेवनामुळे सर्दी खोकल्यापासून लगेच आराम मिळतो.आल्याचा चहा बनवण्यासाठी गरम पाण्यात आलं टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर पाण्यात मध टाकून प्या. यामुळे सर्दी खोकला कमी होईल.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
तुळशीमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. शिवाय सकाळी नियमित १ तुळशीचे पान खाल्यास कोणत्याही आजाराची लागण होणार नाही. सर्दी खोकला झाल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्याऐवजी घरगुती उपाय करूनही आराम मिळवता येतो. गरम पाण्यात तुळशी आणि आलं टाकून चहा तयार करावा. या चहाच्या सेवनामुळे सर्दी खोकला लगेच बरा होईल.