Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या वेळी उशिरा झोपता? वाढू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका, वेळीच करा चुकीच्या सवयींमध्ये बदल

अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी लवकर झोपणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळी उशिरा झोपल्यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात, जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 15, 2025 | 12:30 PM
रात्रीच्या वेळी उशिरा झोपण्याचे दुष्परिणाम

रात्रीच्या वेळी उशिरा झोपण्याचे दुष्परिणाम

Follow Us
Follow Us:

धावपळीच्या जीवनशैलीमुळे सगळ्यांची जीवन जगण्याची पद्धत बिघडली आहे. वाढलेला कामाचा तणाव, आहारात सतत होणारे बदल, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अशात हल्लीची तरुणाई झोपेसंबंधित चुकीचे रुटीन फॉलो करत असल्यामुळे कमी वयातच अनेक गंभीर आजारांमध्ये वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी उशिरा झोपल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. मात्र तरीसुद्धा अनेक लोक रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठतात. यामुळे शरीरात झोपेची कमतरता निर्माण होते.(फोटो सौजन्य – iStock)

पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी चालण्याच्या ‘या’ सवयींमध्ये करा बदल, आठवड्याभरात दिसून येईल फरक

रात्रीच्या वेळी अधिककाळ जाग राहिल्यामुळे शरीरात झोपेची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे हृद्यासंबंधित समस्या किंवा पचनक्रिया बिघडू लागते. पचनक्रिया बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते. त्यामुळे नियमित 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. उशिरापर्यंत काम, टीव्ही किंवा मोबाईल पाहत राहिल्यामुळे आरोग्यासोबतच डोळ्यांचे सुद्धा नुकसान होते. त्यामुळे कमीत कमी जागरणं करून योग्य वेळी झोपण्याचा प्रयत्न करावा. आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळी उशिरा झोपल्यामुळे आरोग्यावर कोणते गंभीर परिणाम दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

रात्रीच्या वेळी उशिरा झोपल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या:

रात्रीच्या वेळी उशिरा झोपल्यामुळे हाय ब्लड प्रेशर किंवा हृद्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी योग्य वेळात झोपावे. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. रात्री उशिरा झोपल्यामुळे शरीरात इन्फेक्शनचा धोका वाढतो आणि गंभीर आजार होतात. शरीरात होणारे हार्मोन्सचे असंतुलन, पचनसंबंधित समस्या, त्वचा आणि केसांसंबधित समस्या, मधुमेह इत्यादी गंभीर आजार वाढण्याची शक्यता असते. अपुऱ्या झोपेमुळे मेंदूची स्मरणशक्ती कमजोर होते आणि मानसिक तणाव वाढू लागतो. शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.

रात्रीच्या वेळी किती वेळ झोपणे आवश्यक आहे?

दिवसभर काम करून थकल्यानंतर रात्रीच्या वेळी शरीराला आरामाची आवश्यकता असते. विश्रांती घेतल्यामुळे शाररिक आणि मानसिक तणाव कमी होतो. त्यामुळे झोप घेणे आवश्यक आहे. वयोमानानुसार किती वेळ झोपणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया. शाळेत जाणाऱ्या मुलांनी कमीत कमी 9 ते 13 तास झोप घेणे आवश्यक आहे, तर टीनएजर्सनी 9 ते 10 तास, तरूणांनी 7 ते 9  तास झोप घ्यावी. तर वृद्धांनी सुद्धा 7 ते 9 तास झोप घेणे आवश्यक आहे.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून आहारात करा ‘या’ २० रुपयांच्या कडू भाजीचा समावेश, शरीर होईल शुगर फ्री

झोपण्याची योग्य वेळ कोणती:

रात्रीच्या अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित रात्री जेवण झाल्यानंतर २ तासांनी झोपावे. साधारणता रात्री 10 वाजता झोपणे आवश्यक आहे. ज्यावेळी सूर्यास्त होतो तेव्हा शरीरामध्ये मेलिटेनियम हार्मोन रिलीज होऊ लागतात, जे झोपेसाठी आवश्यक आहेत. तसेच सकाळ झाल्यानंतर ते संपून जातात.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Problems caused by sleeping late what is the right time to sleep side effects of sleeping late at night at night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • side effect
  • Sleeping at Night

संबंधित बातम्या

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी
1

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या
2

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
3

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या
4

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.