कारल्याचा रस पिण्याचे फायदे
जगभरात मधुमेह या गंभीर आजाराचे रुग्ण वेगाने वाढतं आहेत. मधुमेह झाल्यानंतर दैनंदिन आहारात बदल करून अनेक सवयींवर निर्बंध घालावे लागतात. धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, जंक फूड, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. कारण मधुमेह शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचवतो. त्यामुळे शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. याशिवाय आहारात अनेक पथ्य पाळावी लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
मधुमेह झाल्यानंतर शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते, याशिवाय उच्च रक्तदाब इतर अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे नैसर्गिक पदार्थांचे सेवन करत मधुमेहावर नियंत्रण मिळवावे. मधुमेह झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध उपचार करत आरोग्याची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कारल्याचे कसे करावे? यामुळे शरीराला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कारल्याचे सेवन करावे. कारल्याचा रस किंवा कारल्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे वाढलेला मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होईल. मधुमेह झाल्यानंतर कारल्याच्या भाजीचे सेवन करणे आवश्यक आहे. यामध्ये असलेले अँटी-डायबेटिक घटक शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढून रक्तामधील ग्लुकोज पातळी कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
मधुमेह झाल्यानंतर कारल्याचे सेवन करावे. कारल्याचा रस, भाजी किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता. कारल्याचा रस प्याल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. कारल्यामध्ये चॅरेटिन आणि पॉलिपेप्टाइड-पी इत्यादी घटक आढळून येतात. या गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या कारल्याचे सेवन केल्यास आरोग्य सुधारते.
सांध्यांमधील लवचिकता वाढवण्यासाठी मधात मिक्स करा ‘या’ फळाची पावडर, वयाच्या ७० मध्ये हाडं राहतील टणक
कारल्याच्या रसामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. यामुळे शरीरात वाढलेली साखर नियंत्रणात राहते. कारल्याचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम, कारलं किसून घ्या. त्यानंतर त्यातील रस काढून त्यात चवीनुसार मीठ टाकून प्यावे. हा रस तुम्ही आठवड्यातून तीनदा किंवा नियमित पिऊ शकता. कारल्याचा रस प्याल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. या रसामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स आढळून येते.