Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या या शहरांना म्हटले जाते ‘पर्वतांची राणी’, नैसर्गिक सौंदर्य आणि आल्हाददायी वातावरण परदेशी पर्यटकांना करते आकर्षित

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये थंड हवा, निसर्गरम्य दृश्यं आणि शांत वातावरण अनुभवायचं असेल तर भारतातील काही हिल स्टेशन पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतात. पर्वतांनी वेढलेली ही ठिकाणे नैसर्गिक सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 29, 2026 | 09:03 AM
भारताच्या या शहरांना म्हटले जाते 'पर्वतांची राणी', नैसर्गिक सौंदर्य आणि आल्हाददायी वातावरण परदेशी पर्यटकांना करते आकर्षित

भारताच्या या शहरांना म्हटले जाते 'पर्वतांची राणी', नैसर्गिक सौंदर्य आणि आल्हाददायी वातावरण परदेशी पर्यटकांना करते आकर्षित

Follow Us
Follow Us:
  • थंड हवामान आणि हिरव्यागार पर्वतरांगांमुळे पर्यटकांची कायम पसंती.
  • निसर्ग, इतिहास आणि स्थानिक संस्कृतीचा सुंदर मिलाफ अनुभवता येतो.
  • शांत वातावरणामुळे रिलॅक्सेशन आणि फॅमिली ट्रिपसाठी उत्तम पर्याय मानले जातात.
भारतात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे सुंदर ठिकाणे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत अधिकतर लोक थंड हवेची ठिकाणे निवडतात, तुम्हीही असे ठिकाण शोधत असाल तर आम्ही सांगत असलेले हे ठिकाण तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरु शकते. आज आम्ही तुम्हाला देशातील दोन असे ठिकाण सांगत आहोत ज्यांना पर्वतांची राणी म्हणून ओळखले जाते. थंड हवा, ढगांनी वेढलेले पर्वत आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. आजकाल अनेकजण कामाच्या तणामामुळे त्रस्त आहेत अशात एका शांत आणि सुंदर ठिकाणी कुठे जायचं तर ही दोन ठिकाणे तुमच्यासाठी परफेक्ट ठरतील. चला ही नक्की कोणती ठिकाणे आहेत ते जाणून घेऊया.

गोव्याला जाऊन कंटाळलात? मग यावेळी निवडा पदुचेरीचा पर्याय, फक्त मंदिर आणि बीच नाही इथे फिरण्यासाठी आहेत असंख्य ठिकाणे

कोणत्या शहरांना म्हटले जाते पर्वतांची राणी

देशातील दोन शहरांंना पर्वातांची राणी म्हणून ओळखले जाते. ही दोन ठिकाणे म्हणजे मसूरी आणि शिमला. ही दोन्ही शहरे आपल्या नैसर्गिक साैंदर्यासाठी ओळखली जाते. उत्तराखंड राज्यातील डेहराडून जिल्ह्यात मसूरी वसले आहे. डेहराडूनपासून साधारण ३५ किलोमीटर अंतरावर वसलेले हे ठिकाण इथल्या थंड हवेसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. मसूरीमध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर आणि नयनरम्य ठिकाणे आहेत. इथे तुम्ही केम्प्टी फॉल्स, गन हिल, मॉल रोड आणि लाल टिब्बा यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. इथे इतिहास आणि पारंपारिक वास्तुकलेची अनोखी झलक पाहायला मिळते.

नॅचरल ब्यूटीसाठी लोकप्रिय आहे दुसरे ठिकाण

शिमला देखील एक असे शहर आहे ज्याला पर्वतांची राणी म्हणून ओळखले जाते. शिमलात जंगल आणि निसर्गरम्य टेकड्या पाहायला मिळतात. उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे २,२०० मीटर (७,२३८ फूट) उंचीवर वसलेले हे ठिकाण ब्रिटिशांच्या काळापासून ‘क्वीन ऑफ हिल्स’ या नावाने ओळखले जाते. शिमलात तुम्ही मॉल रोड, जाखू मंदिर , ख्राइस्ट चर्च, लक्कर बाजार यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

Travel News : पाण्यामध्ये तरंगणारं नॅशनल पार्क, इथे होडीत बसून केली जाते जंगल सफारी

मसूरी आणि शिमला दोन्ही ठिकाणे आपल्या नैसर्गिक साैंदर्यासाठी आणि तिथल्या थंड वातावरणासाठी ओळखले जातात. उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणातून मुक्तता हवी असेल आणि कुठे सुंदर ठिकाणी फिरायला जायचं असेल तर तुम्ही पर्वतांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसूरी आणि शिमलाची निवड नक्कीच करु शकता.

 

Web Title: Queen of hills mussoorie and shimla best summer tourist destinations in india travel news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • places to visit
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय
1

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या
2

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू
3

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?
4

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.