Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चविष्टही आणि पौष्टिकही! क्विनोआ-व्हेजिटेबल खिचडी ठरेल आरोग्यासाठी सुपरफूड; जाणून घ्या रेसिपी

Quinoa Vegetable Khichdi Recipe: तुम्हालाही वजन कमी करण्यासाठी काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खाण्याची इच्छा होतेय, मग ही क्विनोआ-व्हेजिटेबल खिचडी रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 29, 2026 | 08:51 PM
photo- Ai Generated

photo- Ai Generated

Follow Us
Follow Us:

दररोजच्या आहारात काहीतरी चविष्ट आणि पौष्टिक खायचे असेल, तर क्विनोआ-व्हेजिटेबल खिचडी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पारंपरिक खिचडीला हेल्दी ट्विस्ट देणारी ही रेसिपी प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही हा पदार्थ उपयुक्त मानला जातो. कमी तेलात आणि कमी वेळात तयार होणारी ही खिचडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकते. चला तर जाणून घेऊयात क्विनोआ-व्हेजिटेबल खिचडीची झटपट रेसिपी.

Eating Schedule: सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत… जेवणाची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

क्विनोआ-व्हेजिटेबल खिचडीसाठी लागणारे साहित्य

  • १ कप क्विनोआ (स्वच्छ धुऊन)
  • ½ कप मूगडाळ
  • १ गाजर (बारीक चिरलेले)
  • ½ कप हिरवे मटार
  • ७ ते ८ फरसबी (चिरलेली)
  • १ लहान कांदा (बारीक चिरलेला)
  • १ टोमॅटो (चिरलेला)
  • १ चमचा जिरे
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट
  • ½ चमचा हळद
  • ½ चमचा लाल तिखट (ऐच्छिक)
  • चवीनुसार मीठ
  • १ ते २ चमचा तूप किंवा तेल
  • ३ ते ४ कप पाणी
  • कोथिंबीर आणि लिंबाचा रस

कृती

सर्वप्रथम क्विनोआ आणि मूगडाळ स्वच्छ धुऊन घ्या. कुकरमध्ये तूप किंवा तेल गरम करून त्यात जिरे घाला. जिरे तडतडल्यावर कांदा आणि आले-लसूण पेस्ट परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो, गाजर, फरसबी आणि मटार घालून दोन ते तीन मिनिटे शिजवा. आता हळद, तिखट आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करा. त्यात धुतलेले क्विनोआ आणि मूगडाळ घालून हलके परता. शेवटी आवश्यक तेवढे पाणी घालून कुकरचे झाकण लावा आणि ३ ते ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. कुकरचा दाब उतरल्यावर खिचडी हलक्या हाताने ढवळा. वरून कोथिंबीर, थोडे तूप आणि लिंबाचा रस घालून गरमागरम सर्व्ह करा.

या खिचडीचे आरोग्यदायी फायदे

क्विनोआमध्ये उच्च दर्जाचे वनस्पतीजन्य प्रोटीन, फायबर आणि अनेक आवश्यक खनिजे असतात. भाज्या आणि मूगडाळ यांचा समावेश असल्यामुळे ही खिचडी पचनासाठी हलकी, पोटभर राहणारी आणि संतुलित आहाराचा उत्तम भाग ठरते. नियमित व्यायाम करणारे, वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणारे आणि पौष्टिक आहार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही रेसिपी चांगला पर्याय मानली जाते.

रोज मेयोनीज खाता? चवीचा मोह आरोग्यावर पडेल भारी! खाण्यापूर्वी जाणून घ्या दुष्परिणाम

Web Title: Quinoa vegetable khichdi recipe health benefits protein rich food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food
  • food recipe

संबंधित बातम्या

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
1

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
2

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
4

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.