बदलत्या वातावरणामुळे केसांच्या समस्यादेखील वाढू लागल्या आहेत. आपल्या सौंदर्यात भर पाडण्यात केसांची फार मदत होत असते. केसांची नीट काळजी न घेतल्यास ती खराब होऊ लागतात आणि नंतर ते आतून कोरडे होऊन तुटायला लागतात. कोंडा, टाळू कोरडा पडणे, केसगळती अशा अनेक समस्या आपल्याला जाणवू लागतात. यामुळे आपली केस आणखीनच खराब आणि निस्तेज होऊ लागतात. तुम्हालाही केसांच्या समस्या जाणवत असतील तर आजच सावध व्हा आणि वेळीच केसांची योग्य काळजी घेण्यास सुरुवात करा.
केसांच्या विविध समस्येवर उपाय म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी एक खास घरगुती हेअर मास्कची माहिती सांगत आहोत. केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा हेअर मास्क फायद्याचा ठरू शकतो. तांदळाच्या पिठाचा हा हेअर मास्क कसा तयार करायचा आणि याला लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
हेदेखील वाचा – 100 अंड्यांच्या बरोबरीचा आहे हा व्हेज पदार्थ, आहारात करा समावेश, वयाची नव्वदीतही ठणठणीत रहाल
केसांना पोषण मिळते
कोरफड आणि तांदळाच्या पिठाचा हा हेअर मास्क केसांना लावल्याने केसांना खूप फायदे मिळतात. प्रथम हे केसांना आतून मॉइश्चरायझ करते आणि नंतर टाळूमध्ये रक्ताभिसरण गतिमान करते. याशिवाय याच्या मदतीने केसांना पोषण मिळते, ज्यामुळे केस दाट आणि लांब होतात.
केस रेशमी आणि मुलायम बनतात
कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी तांदूळ आणि कोरफडीचा हेअर पॅक फायदेशीर ठरतो. केसांचा पोत सुधारण्यास याची फार मदत होते. यामुळे केस रेशमी आणि सुंदर बनतात. हे केसांना पोषण देते आणि यामुळे केस आणखीन निरोगी होतात.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.