जेवणाच्या ताटात जर गव्हाच्या पिठाच्या चपात्या नसतील तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. आपल्यातील अनेकांना कायमच आहारात चपाती लागते. तसेच जेवणाच्या डब्यात सुद्धा आवडीने चपाती खाल्ली जाते. पण रात्रीच्या वेळी अतिशय हलका आणि सहज पचन होणारा आहार घ्यावा. कारण रात्रीच्या वेळी शरीराची पचनक्रिया मंदावते आणि खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. याचा थेट परिणाम पचनक्रियेवर होतो. चला तर जाऊन घेऊया रात्रीच्या जेवणात नियमित किती चपात्या खाव्यात? चपाती खाल्ल्यामुळे शरीराला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
रात्रीच्या जेवणात दररोज किती चपात्या खाव्यात? वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी मानला जाणारा हेल्दी पदार्थ

दिवसभर सतत काहींना काही शारीरिक हालचाली होत असतात. पण रात्रीच्या वेळी शारीरिक हालचाल जास्त होत नाही. याचा थेट परिणाम पचनावर लगेच दिसून येतो. यामुळे पोटावर अनावश्यक चरबीचे परिणाम वाढू लागते.

पुरुषांची शारीरिक मेहनत आणि कॅलरी महिलांच्या तुलनेत खूप जास्त असतात. तरीसुद्धा रात्रीच्या वेळी जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ खाऊ नये. त्यामुळे पुरुषांनी रात्रीच्या जेवणात २ किंवा ३ चपात्या खाव्यात.

जर तुमचे वजन जास्त असेल तर रात्रीच्या जेवणात केवळ २ चपात्या खाव्यात. चपात्यांसोबत वेगवेगळ्या पालेभाज्या आणि पातळ डाळींचे सेवन करावे. महिलांची चयापचय क्रिया पुरुषांच्या तुलनेत मंदावलेली असते.

रात्रीच्या जेवणात कॅलरीजवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे महिलांनी रात्रीच्या आहारात १ किंवा २ एवढ्याच चपात्या खाव्यात. त्यापेक्षा जास्त चपात्या खाऊ नये. १ चपातीसोबत भाजी किंवा वाटीभर सूप प्यावे.

रात्रीच्या जेवणात केवळ चपात्यांवर अवलंबून न राहता, इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. डाळ, उसळ किंवा पनीर यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहील.






