पायांच्या घोट्यांवरील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
सर्वच महिला आणि पुरुष त्वचेच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतात. मात्र पाय आणि हातांच्या त्वचेकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे केल्यामुळे हातापायांची त्वचा काळी पडू लागते. पायांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे पाय काहीवेळा पूर्णपणे काळे दिसू लागतात. कितीही घासले किंवा काही केलं तरीसुद्धा पायांवरील काळेपणा निघून जात नाही. हळूहळू हातापायांची त्वचा खराब होऊ लागते. खराब झालेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे योग्यवेळी हातापायांच्या त्वचेकडे लक्ष देऊन काळजी घ्यावी. बाहरेच्या सूर्यप्रकाशामुळे हातापायांची त्वचा काळवंडून जाते. त्वचेसोबतच हात आणि पाय टॅन होऊन जातात. तसेच पायांचे घोटे सुद्धा काळे होतात. पायांचे घोटे काळे झाल्यानंतर त्वचा रुक्ष आणि निस्तेज दिसू लागते.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: आंघोळीनंतर या 4 गोष्टी लावा, असा चमकेल चेहरा..
अनेकांच्या पायांच्या घोट्याजवळीची त्वचा काळी पडलेली असते. पायांचे घोटे काळे झाल्यानंतर ते चांगले दिसत नाही. अशावेळी अनेक महिला बाजारात मिळणाऱ्या क्रीम्स किंवा इतर प्रॉडक्ट लावतात. पण त्याचा फारसा वापर त्वचेवर होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पायांच्या घोट्यांवरील काळेपणा घालवण्यासाठी सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यास पायांच्या घोट्यांवरील काळेपणा कमी होऊन त्वचा मऊ आणि उजळदार दिसेल. केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावे. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या उजळदार होण्यास मदत होते.
हे देखील वाचा: डार्क सर्कल दूर करण्याचे उपाय
पायांच्या घोट्यांवरील काळेपणा घालवण्यासाठी तयार केलेली पेस्ट पायांच्या घोट्यांवर लावून घ्या. त्यानंतर 5 ते 10 मिनिटं हलक्या हाताने पायांवर मसाज करा. यामुळे काळेपणा कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं पेस्ट तशीच लावून ठेवा. त्यानंतर पाय पाण्याने स्वच्छ धुवा. ही पेस्ट नियमित पायांना लावल्यास पायांवरील काळेपणा कमी होऊन त्वचा मऊ आणि उजळदार होईल. तांदळाच्या पिठात असलेले गुणधर्म पायांवरील काळेपणा घालवण्यासाठी मदत करतील.