ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या बदलानं प्रत्येक राशीला वेगवेगळा लाभ मिळणार आहे. धनु राशीसाठी हे वर्ष लाभदायक आणि आनंनदायक ठरणार आहे. या वर्षात व्यापाऱ्यांना अधिक लाभ होईल. कुटुंबातील प्रेम संबंधातही वाढ होईल. करिअरमध्ये प्रगती होण्याचे संकेत आहेत. डिसेंबर महिन्यात आर्थिक लाभ होईल.
[read_also content=”वृश्चिक राशीचे वार्षिक राशीफल २०२३- नवे वर्ष वृश्चिक राशीसाठी काय घेऊन आले आहे? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य https://www.navarashtra.com/lifestyle/scorpio-yearly-horoscope-new-year-what-does-the-new-year-bring-for-scorpio-know-the-yearly-horoscope-358380.html”]
करियर आणि व्यापार– १७ जानेवारीला शनी कुंभ राशीत प्रवेश करणार असल्यानं धनु राशीची साडे साती संपेल. यामुळं व्यापारात चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्साहातही वाढ होईल. करियरसाठीही येणार काळ हा अनुकूल असणार आहे.
प्रकृती आणि कुटुंब– प्रकृतीच्या दृष्टीनेही नवे वर्ष चांगले असणार आहे. बीपी आणि डायबेटिस असणाऱ्यांनी नियमित तपासण्या आणि औषधोपचार घेण्याची गरज आहे. जोखीम घेऊ नका, कुटुंबासह हे वर्ष चांगले जाणार आहे. नव्या व्यक्तींचे आगमन कुटुंबात होण्याची शक्यता आहे.
लव्ह लाईफ– लव्ह लाईफमध्ये या वर्षी नवी उर्जा येईल. नात्यांत सुधारणा दिसेल. पार्टनरसोबत चांगला काळ व्यतित कराल. जानेवारी ते मार्च या काळात अविवाहितांसाठी चांगली स्थळे येतील. जगण्यात नव्या स्थानावर जाण्याची या वर्षात संधी आहे.