Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्त्री शक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या मंदिरात समंथाने गुपचूप उरकलं लग्न, मंदिराची खासियत ऐकाल तर थक्क व्हाल

अभिनेत्री समंथा रुथ प्रभु आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी तामिळनाडूतील एका मंदिरात खासगिरित्या आपलं लग्न उरकलं आहे. हे मंदिर स्त्री शक्तीचे प्रतीक मानले जातं असून ते नक्की आहे ते जाणून घेऊया. 

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 02, 2025 | 08:17 AM
स्त्री शक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या मंदिरात सामंथाने गुपचूप उरकलं लग्न, मंदिराची खासियत ऐकाल तर थक्क व्हाल

स्त्री शक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या मंदिरात सामंथाने गुपचूप उरकलं लग्न, मंदिराची खासियत ऐकाल तर थक्क व्हाल

Follow Us
Close
Follow Us:

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभु आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी अखेर विवाहबंधनात प्रवेश केला आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू होती आणि आता त्यांनी शांत व आध्यात्मिक वातावरणात, तमिळनाडूमधील लिंगा भैरवी मंदिरात अतिशय साधेपणाने लग्न केले. माध्यमातील माहितीनुसार, त्यांच्या या खास समारंभाला केवळ ३० लोक उपस्थित होते. सामंथाने या प्रायव्हेट वेडिंगसाठी लाल रंगाची पारंपरिक साडी परिधान केली होती. काही वेळापूर्वीच तिने आपल्या इंस्टाग्रामवर विवाहाचे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.

Top Travel Spots: ‘ही’ 15 ठिकाणे आयुष्यात एकदा तरी अवश्य पहावीतच; आजच बनवा Bucket list!

लिंगा भैरवी मंदिरात घेतले सात फेरे

कोयंबटूरजवळील ईशा योगा सेंटर परिसरात साधगुरू यांनी स्थापित केलेले लिंगा भैरवी मंदिर शांत, पवित्र आणि ऊर्जायुक्त वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच हे ठिकाण लोकांमध्ये आज अचानक चर्चेचा विषय ठरले. दोन्ही जणांनी याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा उरकला आणि अधिकृत छायाचित्रे समोर आल्यानंतर चाहत्यांचे लक्ष मंदिराकडेही वळले आहे.

देवी लिंगा भैरवी

ईशा फाउंडेशनच्या माहितीनुसार, हे मंदिर देवी लिंगा भैरवी यांना अर्पण केलेले आहे. देवीला स्त्रीशक्तीचे सामर्थ्यवान रूप मानले जाते. भक्तांच्या कल्याणासाठी, मानसिक बळासाठी आणि जीवनातील समृद्धीसाठी देवी कृपा करते, असा विश्वास येथे असलेल्या साधकांचा आहे.

मंदिराची वास्तुरचना 

  • या मंदिराचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची रचना.
  • मंदिराच्या बाहेरील भिंती उलट्या त्रिकोणाच्या आकारात बांधल्या आहेत, ज्यात सर्जन आणि सृष्टीच्या गर्भाचे प्रतीक दडलेले आहे.
  • मंदिराच्या आत मात्र सरळ त्रिकोण तयार केलेला असून तो पुरुष ऊर्जा किंवा ‘निर्मितीच्या जन्मावस्थे’चे प्रतिनिधित्व करतो.
  • ही अनोखी रचना स्त्री-पुरुष उर्जेच्या संतुलनाचा आध्यात्मिक संदेश देते.
IRCTC Tour Package: ‘या’ खास पॅकेजमध्ये ‘Vande Bharat’ने करता येईल अरुणाचल प्रदेशची एक अविस्मरणीय बजेट-फ्रेंडली Trip!

लिंगा भैरवी मंदिरात कसे पोहोचाल?

  • हे मंदिर कोयंबटूरपासून सुमारे ३० किलोमीटर पश्चिमेस वसलेले आहे.
  • कोयंबटूर दक्षिण भारतातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गाने देशभराशी जोडलेले आहे.
  • चेन्नई, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू यांसारख्या शहरांतून कोयंबटूरला नियमित उड्डाणे मिळतात.
  • भारतातील बहुतांश मोठ्या शहरांतून येथे थेट ट्रेनची सोय उपलब्ध आहे.
  • कोयंबटूरहून ईशा योगा सेंटरकडे जाणाऱ्या बस सेवा नियमित आहेत.
  • विमानतळ आणि  रेल्वे स्थानकावरून टॅक्सी सहज मिळतात, तसेच इच्छुकांनी ईशा सेंटरच्या ट्रॅव्हल डेस्कमधूनही टॅक्सी बुक करू शकता.

Web Title: Samantha ruth prabhu marries with raj nidimoru in linga bhairavi temple travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 08:16 AM

Topics:  

  • samantha ruth prabhu
  • Tamilnadu
  • temple
  • travel news

संबंधित बातम्या

अखेर सामंथाने नव्याने थाटला संसार! दिग्दर्शक राज निदिमोरूशी केले लग्न; लग्नाच्या PHOTO ने वेधले लक्ष
1

अखेर सामंथाने नव्याने थाटला संसार! दिग्दर्शक राज निदिमोरूशी केले लग्न; लग्नाच्या PHOTO ने वेधले लक्ष

देशात ‘या’ मंदिरांमध्ये प्रसाद खायला सक्त बंदी! काय आहे कारण? जाणून घ्या
2

देशात ‘या’ मंदिरांमध्ये प्रसाद खायला सक्त बंदी! काय आहे कारण? जाणून घ्या

Top Travel Spots: ‘ही’ 15 ठिकाणे आयुष्यात एकदा तरी अवश्य पहावीतच; आजच बनवा Bucket list!
3

Top Travel Spots: ‘ही’ 15 ठिकाणे आयुष्यात एकदा तरी अवश्य पहावीतच; आजच बनवा Bucket list!

IRCTC Tour Package: ‘या’ खास पॅकेजमध्ये ‘Vande Bharat’ने करता येईल अरुणाचल प्रदेशची एक अविस्मरणीय बजेट-फ्रेंडली Trip!
4

IRCTC Tour Package: ‘या’ खास पॅकेजमध्ये ‘Vande Bharat’ने करता येईल अरुणाचल प्रदेशची एक अविस्मरणीय बजेट-फ्रेंडली Trip!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.