Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: ग्लोइंग स्किनचे रहस्य तुमच्या किचनमध्ये; आहारात करा ‘या’ सुपरहेल्दी सीड्सचा समावेश

Seeds For Healthy Skin: निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि हेल्दी फॅट्सने समृद्ध काही बिया नियमित आहारात घेतल्यास त्वचेचे आरोग्य सुधारून नैसर्गिक तेज वाढू शकते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 13, 2026 | 07:55 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • तजेलदार त्वचा हवी आहे?
  • ग्लोइंग स्किनचे रहस्य तुमच्या स्वयंपाकघरात
  • आहारात समाविष्ट करा हे सुपरहेल्दी सीड्स
आजकाल प्रत्येकाला निरोगी, चमकदार आणि डागमुक्त त्वचा हवी असते. यासाठी अनेकजण महागडी ब्यूटी प्रोडक्ट्स, फेशियल्स आणि विविध स्किनकेअर प्रोडक्टस् वापरतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, त्वचेचे खरे सौंदर्य बाहेरून नव्हे तर आतून येते. योग्य आहार, पुरेसे पाणी आणि पोषक घटकांनी भरलेले अन्न त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते. विशेषतः काही बिया अशा आहेत, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि हेल्दी फॅट्स आढळतात. या बियांचा नियमित आहारात समावेश केल्यास त्वचेचे आरोग्य सुधारू शकते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज दिसू शकते.

Kitchen Tips: कांदा कापताना डोळ्यांत पाणी येते? ‘या’ घरगुती उपायांनी होईल समस्या दूर

अळशीच्या बिया

अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक हार्मोन्स संतुलित राखण्यास मदत करतात. नियमित सेवनामुळे त्वचा कोरडी पडण्याची समस्या कमी होते आणि त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो. यामुळे चेहऱ्यावरील तजेला वाढण्यास मदत होते.

चिया बिया

चिया बिया शरीरात पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करतात. या बियांमध्ये फायबर, प्रथिने आणि ओमेगा-३ मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा अधिक हायड्रेटेड राहते आणि तिची चमक टिकून राहते.

सूर्यफूल बिया

सूर्यफूल बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक त्वचेला प्रदूषण आणि फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवतात. त्वचेचे अकाली वृद्धत्व कमी करण्यासही त्यांची मदत होते.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि आवश्यक पोषक घटक असतात. झिंक कोलेजन निर्मितीला मदत करते, ज्यामुळे त्वचा अधिक टवटवीत आणि लवचिक राहते. मुरुम आणि त्वचेच्या इतर समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही या बिया फायदेशीर मानल्या जातात.

तीळ

तीळामध्ये कॅल्शियम, लोह, हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक त्वचेला आवश्यक पोषण पुरवतात आणि तिची चमक वाढवण्यास मदत करतात. नियमित सेवनामुळे त्वचेची लवचिकता टिकून राहते.

 आहाराला द्या प्राधान्य

सुंदर त्वचेसाठी केवळ ब्यूटी प्रोडक्ट्स अवलंबून राहणे पुरेसे नसते. अळशी, चिया, सूर्यफूल, भोपळा आणि तीळ यांसारख्या पौष्टिक बियांचा आहारात समावेश केल्यास त्वचेला आतून पोषण मिळते. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायामासोबत या बियांचे सेवन केल्यास त्वचा अधिक निरोगी, तजेलदार आणि नैसर्गिकरीत्या चमकदार दिसू शकते. त्यामुळे जर तुम्हालाही नैसर्गिक ग्लो हवा असेल, तर आजपासूनच या सुपरफूड बियांना आपल्या आहाराचा भाग बनवा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Oral Health: अनेक दिवसांपासून एकच टूथब्रश वापरता? आरोग्यासाठी ठरू शकतो धोकादायक; जाणून घ्या बदलण्याची योग्य वेळ

Web Title: Seeds for glowing skin natural beauty tips superfoods for healthy skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • Pumpkin Seeds
  • Seeds
  • skin care tips
  • Sunflower Seeds

संबंधित बातम्या

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल
1

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
2

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!
3

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Simple Home Hacks: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की पहा करून
4

Simple Home Hacks: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की पहा करून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.