सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर लिची उपलब्ध झाल्या आहेत. आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या लिचीचे सगळ्यांनी सेवन केले पाहिजे. लिची चवीला आंबट गोड असते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लिची आवडते. चायनीज चेरी म्हणून सगळीकडे लिचीची ओळख आहे. लिचीचे सेवन केल्याने त्वचेसंबंधित बऱ्याच समस्या दूर होतात.लिचीच्या रसामध्ये जीवनसत्त्वे, फायटोन्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रतिजैविक गुणधर्म आढळून येतात. त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी असलेले विटामिन सी लिचीमध्ये असल्याने त्वचेला अनेक फायदे होतात. यामुळे त्वचा हायड्रेट राहून चमकदार दिसते. आज आम्ही तुम्हाला लिची खाल्ल्याने त्वचेला नेमके काय फायदे होतात. याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
लिची खाल्ल्याने त्वचेला होणारे फायदे:
त्वचा हायड्रेट राहते:
लिचीचे सेवन केल्याने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. लिचीच्या रसात विविध पोषक गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा उजळते. उष्णतेमुळे त्वचेवर आलेले फोड, त्वचा लाल होणे, पुरळ इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो. लिचीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.
त्वचेचे आरोग्य सुधारते:
त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आपण अनेक क्रीम किंवा इतर केमिकल फेशिअल करून घेतो पण त्याचा फारसा परिणाम आपल्या त्वचेवर होत नाही. त्यामुळे शरीराला आतून पोषक घटकांची आवश्यकता असते. अशावेळी तुम्ही लिची खाऊ शकता. लिचीमध्ये असलेल्या रसामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्वचा कायम ओलसर राहते. यामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा, सुरकुत्या आणि निस्तेजपणा कमी होतो.
जळजळ कमी होते:
उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर अनेकांना त्वचेसंबंधित समस्या जाणवतात.काहींची त्वचा लाल होते ते काहींच्या त्वचेवर सतत जळजळ जाणवते. पॉलिफेनॉलने समृद्ध असलेल्या लिचीच्या रसात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे चेहऱ्यावर रॅश किंवा पुरळ येत नाही.
आरोग्याला प्रोत्साहन मिळते:
लिचीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. विटामिन बी, पोटॅशियम आणि तांबे यासारख्या विविध पोषक तत्वांनी समृद्ध असलेली लिची सगळ्यांचं आवडते. लिची हे जून जुलै या दोन महिन्यांमध्ये मिळते. यामुळे चयापचय सुधारतो, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच हृदयाच्या आरोग्यास चालना मिळते. लिचीचा रस ऑक्सिडेटिव्ह ताण काढून टाकण्यास मदत करतो. यामुळे केस आणि त्वचेला फायदे होतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.