प्रवासादरम्यान त्वचेची काळजी कशी घ्यावी
वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे आरोग्यसंबंधित अनेक समस्या जाणवतात. राज्यभरात सगळीकडे जोरदार पाऊस सुरु झाला आहे.पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे थंडगार आणि हिरवे गार वातावरण होते. अशा वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अनेक लोक बाहेर फिरायला जातात. बाहरेच्या वातावरणात फिरल्यानंतर संपूर्ण चेहरा काळवंडलेला दिसू लागतो. टॅनिंग, खाज सुटणे, रॅशेस किंवा सन बर्न इत्यादी अनेक त्वचेसंबंधित समस्या जाणवू लागतात. त्यामुळे या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी प्रवासाला बाहेर जाताना नेहमी बॅगमध्ये सनस्क्रीन ठेवावे, तसेच शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ आणि भरपूर पाणी प्यावे, ज्यामुळे तुम्ही डिहायड्रेट होणार नाही. आज आम्ही तुम्हाला बाहेर फिरायला गेल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी,याबद्दल काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स नक्की फॉलो करा.(फोटो सौजन्य-istock)
बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा ट्रेकला गेल्यानंतर सतत पाणी प्यावे. जेणेकरून तुमचे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल. अनेक लोक बाहेर प्रवासाला गेल्यानंतर पाणी पिणे टाळतात. पण असे केल्याने शरीरातील एनर्जी कमी होऊन जाते. त्यामुळे बॅगमध्ये सोबत पाणी, ज्यूस, ब्लॅक आणि ग्रीन टी इत्यादी अनेक पदार्थ ठेवावे.
हे देखील वाचा: तुम्हाला माहितेय हेल्दी राहण्यासाठी रोज कोणत्या भाज्या खाव्यात?
उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीन लावल्यानंतर त्वचेचे सूर्याच्या किरणांपासून रक्षण होते. अति उष्णता, आर्द्रता, थंड वारे यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू नये म्हणून सनस्क्रीन लावावे. त्यामुळे बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा ट्रेकिंगला जाताना सनस्क्रीन नेहमी बॅगमध्ये ठेवावे.
प्रवासादरम्यान त्वचेची काळजी कशी घ्यावी
बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा ट्रेकिंग ला गेल्यानंतर सोबत विटामिन सी युक्त पदार्थ ठेवावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. विटामिन सी युक्त पदार्थांमध्ये लिंबूवर्गीय फळांचा समावेश करावा. विटामिन सी चेहऱ्यावरील चमक वाढते.तसेच त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी बाजारात विटामिन सी ने समृद्ध असलेली उत्पादने सुद्धा उपलब्ध झाली आहेत.
हे देखील वाचा: पावसाळ्यात पहाटेचा पहिला सूर्यप्रकाश आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
प्रवासाला बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा ट्रेकिंगला जाऊन आल्यानंतर चेहरा पूर्णपणे टॅन होऊन जातो. चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी आणि निरोगी त्वचेसाठी फेस योगा करावेत. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसून येईल. बलून फेस, फिश फेस, किसिंग फेस हे सर्व योगाचे प्रकार आहेत.