Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक रुपयाही खर्च न करता घरच्या घरी मिळवा पार्लरसारखा ग्लो; हळदीचे ‘हे’ फेस पॅक नक्की करा ट्राय

Turmeric Face pack for glowing Skin: महागड्या स्किनकेअर प्रॉडक्ट्सशिवायही घरातील नैसर्गिक घटकांच्या मदतीने त्वचेची प्रभावी काळजी घेता येते. तुम्हालाही घरच्या घरी चमकदार त्वचा हवी असेल तर हे फेस पॅक नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 13, 2026 | 07:46 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • घरच्या घरी मिळवा पार्लरसारखा ग्लो
  • हळदीचे ‘हे’ फेस पॅक नक्की ट्राय करा
  • फेस पॅक वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा
निरोगी, स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अनेक जण महागडी ब्यूटी प्रोडक्टस वापरतात. तर काही जण पार्लर ट्रीटमेंटचा करतात. मात्र, घरातील काही नैसर्गिक घटकांच्या मदतीनेही त्वचेची योग्य काळजी घेता येते. त्यापैकी हळद हा भारतीय घरांमध्ये सहज उपलब्ध असलेला आणि पारंपरिक सौंदर्य उपचारांमध्ये अनेक वर्षांपासून वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि इन्फ्लेमेशन कमी करण्यास मदत करणारे गुणधर्म असल्याने त्वचेला नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होऊ शकते. मात्र कोणताही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी त्वचेवर पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.

Health Tips: पावसाळ्यात खोकला-तापाकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतात Pneumoniaची सुरुवातीची लक्षणे, अशी घ्या काळजी

हळद आणि बेसनचा फेस पॅक

एक चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि आवश्यकतेनुसार गुलाबजल किंवा साधे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे लावून कोमट पाण्याने धुवा. त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यास आणि चेहरा ताजातवाना दिसण्यास मदत होऊ शकते.

हळद आणि दह्याचा फेस पॅक

दही आणि हळद एकत्र मिसळून तयार केलेला फेस पॅक कोरडी व निस्तेज त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतो. दह्यामधील नैसर्गिक घटक त्वचेला मऊपणा देण्यास मदत करतात, तर हळद त्वचेचा नैसर्गिक चमक वाढवण्यास मदत करू शकते.

हळद आणि मधाचा फेस पॅक

कोरड्या त्वचेसाठी एक चमचा मधामध्ये चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेला ओलावा मिळण्यास आणि तजेलदारपणा टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.

हळद आणि कोरफडीचा फेस पॅक

कोरफडीच्या जेलमध्ये थोडी हळद मिसळून तयार केलेला फेस पॅक संवेदनशील किंवा पिंपल्सची समस्या असलेल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतो. हा पॅक त्वचेला शांत ठेवण्यास मदत करतो.

फेस पॅक वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

हळदीचा वापर मर्यादित प्रमाणात करा, अन्यथा त्वचेवर पिवळसर रंग राहू शकतो. आठवड्यातून एक किंवा दोन वेळाच फेस पॅक वापरा. त्वचेवर जखम, तीव्र अॅलर्जी किंवा जळजळ असल्यास घरगुती उपाय टाळा आणि त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रत्येकाची त्वचा वेगळी असल्याने कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Hair Care Tips: केसांना तेल लावताना ‘या’ चुका टाळा; निरोगी, मजबूत अन् चमकदार केसांसाठी जाणून घ्या योग्य पद्धत

Web Title: Skin care tips turmeric face pack for natural glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Benefits of Turmeric water
  • how to get glowing skin
  • Skin Care
  • skin care tips

संबंधित बातम्या

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे
1

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे

उन्हाळा असो वा पावसाळा, नारळ पाणी ठरेल गुणकारी! जाणून घ्या शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे
2

उन्हाळा असो वा पावसाळा, नारळ पाणी ठरेल गुणकारी! जाणून घ्या शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे

पार्लरला जायचा कंटाळा येतो? मग घरच्या घरी ‘या’ पदार्थांचा वापर करून करा होममेड फेशिअल, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक
3

पार्लरला जायचा कंटाळा येतो? मग घरच्या घरी ‘या’ पदार्थांचा वापर करून करा होममेड फेशिअल, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

पार्लरला जाण्यासाठी वेळ मिळत नाही? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा राहील कायमच फ्रेश आणि ग्लोइंग
4

पार्लरला जाण्यासाठी वेळ मिळत नाही? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा राहील कायमच फ्रेश आणि ग्लोइंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.