Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update: ‘एमआरएनए’ लसीची यशस्वी चाचणी! कर्करोग पुन्हा रोखणार; मेलेनोमा शरीरात पसरण्याचा धोका कमी

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये कॅन्सर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे गंभीर आजारावर उपचारासाठी लेट-स्टेज क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली आहे. ही लस मर्कच्या कीटूडा या इम्युनोथेरपी औषधासोबत देण्यात आली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 22, 2026 | 11:02 AM
'एमआरएनए' लसीची यशस्वी चाचणी! कर्करोग पुन्हा रोखणार; मेलेनोमा शरीरात पसरण्याचा धोका कमी

'एमआरएनए' लसीची यशस्वी चाचणी! कर्करोग पुन्हा रोखणार; मेलेनोमा शरीरात पसरण्याचा धोका कमी

Follow Us
Follow Us:

मॉर्डना आणि मेर्क यांनी विकसित केलेल्या वैयक्तिकृत एमआरएनए कॅन्सर लसीने मेलेनोमाच्या उच्च जोखमीच्या रुग्णांवरील उशिराच्या टप्प्यातील म्हणजेच लेट-स्टेज क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली आहे. ही लस मर्कच्या कीटूडा या इम्युनोथेरपी औषधासोबत देण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर मेलेनोमा पुन्हा होण्याचा किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये पसरण्याचा धोका कमी करण्यासाठी ही वैयक्तिकृत एमआरएनए लस विकसित करण्यात आली आहे. ही लस कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कमी करून दुष्यम उद्दिष्ट असलेल्या मेलेनोमा शरीराच्या इतर भागांमध्ये पसरण्याचा धोका कमी करेल.(फोटो सौजन्य – istock)

फ्रिजमध्ये ठेवलेल्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो आतड्यांच्या इन्फेक्शनचा धोका, शरीरात तयार होतील विषारी घटक

पेशी ओळखण्यात होणार मदतः

रोगप्रतिकारक यंत्रणेला शरीरात उरलेल्या कॅन्सर पेशी ओळखण्यास मदत होऊ शकते. कीटूडा हे मेलेनोमासाठी आधीपासूनच प्रस्थापित उपचार असल्याने हे निकाल महत्त्वाचे आहेत. विद्यमान इम्युनोथेरपीमध्ये वैयक्तिकृत कॅन्सर लस जोडल्याने उपचारांचे परिणाम आणखी सुधारू शकतात. पुढील वर्षी होणार उपलब्ध कंपन्या या उपचाराबाबत नियामक संस्थांशी चर्चा करत आहेत. नियामक मंजुरी मिळाल्यास ते पुढील वर्षीच उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

Health Tips: गाड्यावरचा चहा किती वेळाने प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी ठरू शकतो धोकादायक?

प्रत्येक रुग्णाच्या कॅन्सरनुसार स्वतंत्रपणे तयार:

या उपचाराने चाचणीतील मुख्य उद्दिष्ट साध्य करत कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कमी केला, तसेच दुय्यम उद्दिष्ट असलेल्या मेलेनोमा शरीराच्या इतर भागांमध्ये पसरण्याचा धोका कमी करण्यासही यश मिळवले.
या चाचणीचे सविस्तर निकाल आगामी वैद्यकीय परिषदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे.
संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक लसींपेक्षा वैयक्तिकृत कॅन्सर लस वेगळी असते. ती प्रत्येक रुग्णाच्या कॅन्सरनुसार स्वतंत्रपणे तयार केली जाते. ट्यूमर शस्त्रक्रियेद्वारे काढल्यानंतर त्यातील जनुकीय बदलांचे विश्लेषण केले जाते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: mRNA लस म्हणजे काय?

    Ans: mRNA लस शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेला विशिष्ट लक्ष्य ओळखण्यासाठी प्रशिक्षित करण्यासाठी mRNA तंत्रज्ञानाचा वापर करते. कर्करोगाच्या लसींमध्ये कर्करोगाच्या पेशींशी संबंधित विशिष्ट प्रथिनांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जातो.

  • Que: mRNA लसीमुळे मेलेनोमा पुन्हा होण्याचा धोका कमी होऊ शकतो का?

    Ans: काही क्लिनिकल चाचण्यांमध्ये mRNA-आधारित कर्करोग लसींनी मेलेनोमा पुन्हा होण्याचा धोका कमी करण्याची आशादायक शक्यता दर्शवली आहे.

  • Que: मेलेनोमा म्हणजे काय?

    Ans: मेलेनोमा हा त्वचेतील मेलानिन तयार करणाऱ्या पेशींमध्ये विकसित होणारा त्वचेच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. त्याचे लवकर निदान आणि योग्य उपचार महत्त्वाचे असतात.

Web Title: Successful trial of mrna vaccine set to prevent cancer recurrence reduces risk of melanoma spreading in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Cancer Awareness
  • cancer risks
  • Health Updates

संबंधित बातम्या

Imran Khan: रुग्णालयात तपासणीनंतर इम्रान खान यांना पुन्हा तुरुंगात धाडले; सुप्रीम कोर्टाचा दणका, पाकिस्तानच्या राजकारणात भूकंप
1

Imran Khan: रुग्णालयात तपासणीनंतर इम्रान खान यांना पुन्हा तुरुंगात धाडले; सुप्रीम कोर्टाचा दणका, पाकिस्तानच्या राजकारणात भूकंप

स्वातंत्र्यदिनानिमित्त सूर्या हॉस्पिटलचा अनोखा उपक्रम! मानवी दूध दात्यांचा केला गौरव, नवजात बाळांसाठी दूधदानाचे महत्त्व
2

स्वातंत्र्यदिनानिमित्त सूर्या हॉस्पिटलचा अनोखा उपक्रम! मानवी दूध दात्यांचा केला गौरव, नवजात बाळांसाठी दूधदानाचे महत्त्व

आरोग्य सेवेसाठी पालिकेचा वैद्य AI चॅटबॉट! घराजवळच उपलब्ध असलेल्या रुग्णालयासह उपचाराची माहिती होणार उपलब्ध
3

आरोग्य सेवेसाठी पालिकेचा वैद्य AI चॅटबॉट! घराजवळच उपलब्ध असलेल्या रुग्णालयासह उपचाराची माहिती होणार उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.