फ्रिजमध्ये ठेवलेल्या 'या' पदार्थांमुळे वाढतो आतड्यांच्या इन्फेक्शनचा धोका, शरीरात तयार होतील विषारी घटक
फ्रिजमध्ये ‘हे’ पदार्थ साठवून ठेवल्यास आतड्यांना पोहचेल हानी:
फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नये?
अपचनाच्या समस्या कशामुळे उद्भवतात?
बाजारातून विकत आणलेला भाजीपाला, घरातील शिल्लक राहिलेले पदार्थ, फळे, दूध आणि घरातील इतर पदार्थ कायमच फ्रिजमध्ये ठेवले जातात. दुग्धजन्य पदार्थ फ्रिजमध्ये कायमच सुरक्षित ठेवले जातात. पण फ्रिजमध्ये ठेवलेले सर्वच पदार्थ शरीरासाठी अजिबात चांगले नाही. फ्रिजमध्ये ठेवलेल्या अन्नातील जीवाणूंची वाढ मंदावते आणि अन्नपदार्थांचे आयुष्य वाढण्यास मदत होते, पण हा खूप मोठा गैरसमज आहे. फ्रिजमध्ये साठवून ठेवलेले अन्नपदार्थ काही काळानंतर खराब होऊन जाते. अन्न, भाजीपाला किंवा इतर पदार्थ व्यवस्थित झाकून न ठेवल्यास ते खाण्यायोग्य राहत नाहीत. वारंवार फ्रिजचे दार उघडणे, खूप दिवस पदार्थ फ्रिजमध्ये साठवून ठेवल्यामुळे अन्न कुजण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
Health Tips: गाड्यावरचा चहा किती वेळाने प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी ठरू शकतो धोकादायक?
फ्रिजमधील दूषित अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. अन्नपदार्थ केवळ फ्रिजमध्ये ठेवणे आवश्यक नाही, तर ते योग्य पद्धतीने साठवून ठेवणे फार गरजेचे आहे. फ्रिजमधील शिळे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अन्नपदार्थ ठेवताना योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला फ्रिजमध्ये ठेवलेल्या कोणत्या पदार्थांमुळे आतड्यांमध्ये किंवा शरीरात विषारी घटक तयार होतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात शिल्लक राहिलेला भात किंवा मैद्याचे पदार्थ बऱ्याचदा फ्रिजमध्ये साठवून ठेवले जातात. पण फ्रिजमध्ये २ तासांच्या वर ४°C पेक्षा कमी तापमानात ठेवावा. शिजवलेला भात जास्त वेळ सामान्य तापमानात राहिल्यानंतर त्यात Bacillus cereus नावाचे जीवाणू झपाट्याने वाढतात आणि अन्नातून विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आवश्यक तेवढाच भात किंवा मैद्याचे पदार्थ बनवून ते लगेच खावेत.
अनेकांना शिल्लक राहिलेले चिकन, मटण खायला आवडते. पण मांसाहारी पदार्थांचे सेवन २४ तासांच्या आतमध्ये करावे. दीर्घकाळ फ्रिजमध्ये साठवून ठेवलेले चिकन आणि मटण आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. उकडलेले, भाजलेले, ग्रिल्ड किंवा फ्राय केलेले मांसाहारी पदार्थ थंड करून नंतरच डब्यात भरून ठेवावे. शिजवलेले मांसाहारी पदार्थ २४ तासांच्या आतमध्ये खाणे फायदेशीर मानले जाते. ताजे मासे आणि सी-फूड लवकर खराब होतात. त्यामुळे मासे आणल्यानंतर ते २४ तासांचे आतमध्ये खावेत.
दूध, दही, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ घरात आणल्यानंतर नेहमीच फ्रिजमध्ये साठवून ठेवले जातात. पण जास्त वेळ दुग्धजन्य पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यास पदार्थांना विचित्र वास येऊन त्यांचा रंग आणि गुणवत्ता बदलून जाते. खराब झाल्यानंतर ते सेवन करण्याऐवजी लगेच फेकून द्यावे. शिळ्या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते.
Ans: अन्न चुकीच्या पद्धतीने साठवले गेले किंवा खूप काळ ठेवले गेले तर त्यात हानिकारक सूक्ष्मजीव वाढू शकतात.
Ans: शिजवलेले अन्न, उरलेले पदार्थ, कापलेली फळे-भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ योग्य तापमानात व योग्य कालावधीपेक्षा जास्त काळ साठवणे टाळावे.
Ans: फ्रिजमध्ये ठेवल्याने आपोआप विषारी घटक तयार होतात असे नाही.






