Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वजन अचानक वाढतंय किंवा कमी होतंय? थायरॉईडच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच करा योग्य चाचण्या

थायरॉईड झाल्यानंतर मानेमध्ये लहान ग्रंथी खालच्या भागात तयार होतात. यामुळे सतत घसा बसने, आवाजात होणारे बदल तर काहीवेळा वजन झपाट्याने कमी आणि झपाट्याने वाढते इत्यादी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे योग्य चाचण्या करून थायरॉईड नियंत्रणात ठेवणे फार आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 04, 2026 | 02:00 PM
वजन अचानक वाढतंय किंवा कमी होतंय? थायरॉईडच्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच करा योग्य चाचण्या

वजन अचानक वाढतंय किंवा कमी होतंय? थायरॉईडच्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच करा योग्य चाचण्या

Follow Us
Follow Us:

तुमचा आहार तोच आहे. रोजची हालचालही तशीच आहे. तरीही वजन हळूहळू वाढतंय किंवा कोणताही प्रयत्न न करता अचानक कमी होतंय. अनेकजण यामागचं कारण ताणतणाव, वाढतं वय किंवा जीवनशैलीला देतात. पण कधी कधी तुमचं शरीर एका वेगळ्याच समस्येकडे इशारा करत असतं आणि तो इशारा एका साध्या रक्त तपासणीतून समजू शकतो. नेहमीप्रमाणे खाणं असूनही अचानक वजन वाढतंय? किंवा आहार आणि व्यायामात कोणताही बदल न करता वजन कमी होतंय? जीवनशैली, ताणतणाव आणि वाढतं वय यांचा वजनावर परिणाम होऊ शकतो, पण काही वेळा अशी अनपेक्षित वजनातील वाढ किंवा घट ही थायरॉईडच्या आजाराचं लक्षण असू शकते.याविषयी डॉ. स्मिता हिरास सुदके, रिजनल चीफ ऑफ लॅब, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड, यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

बीट कच्चे खावे की शिजवून? जाणून घ्या बीट खाण्याचे योग्य प्रमाण, पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे

थायरॉईड ग्रंथी म्हणजे काय? छोटा अवयव, पण मोठी जबाबदारी:

थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची लहान ग्रंथी मानेच्या पुढच्या खालच्या भागात असते. या ग्रंथीचं मुख्य काम म्हणजे थायरॉईड हार्मोन्स तयार करणं. आकाराने लहान असली तरी शरीरातील मेटाबॉलिझम (चयापचय), ऊर्जा निर्मिती, हृदयाचं कार्य आणि शरीराचं एकूण संतुलन राखण्यात थायरॉईडची महत्त्वाची भूमिका असते. या हार्मोन्समध्ये बिघाड झाला तर त्याचा थेट परिणाम वजनासह संपूर्ण आरोग्यावर होऊ शकतो. लहान मुलांमध्ये थायरॉईड हार्मोन्स योग्य वाढ आणि विकासासाठी अत्यावश्यक असतात. तर प्रौढांमध्ये हे हार्मोन्स पचनक्रिया, हृदयाचे ठोके, मनःस्थिती आणि शरीराचं तापमान अशा जवळपास प्रत्येक प्रणालीचं नियमन करतात.

थायरॉईड आणि वजन यांचा काय संबंध आहे?

हायपोथायरॉईडीझम (Hypothyroidism): कारण नसताना वजन वाढणे
हायपोथायरॉईडीझम म्हणजे थायरॉईड ग्रंथी पुरेशा प्रमाणात हार्मोन्स तयार करत नाही. त्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो.
थायरॉईड हार्मोन्स कमी झाल्यावर शरीर कमी कॅलरीज जाळतं. त्यामुळे आहारात कोणताही बदल नसतानाही वजन वाढू शकतं आणि शरीरात पाणी साचल्यामुळे सूजही येऊ शकते.

याची प्रमुख लक्षणे

  • सतत थकवा जाणवणे आणि आळस येणे
  •  वातावरण गरम असतानाही थंडी वाजणे
  • त्वचा कोरडी पडणे, केस ठिसूळ होणे किंवा केस गळणे
  • बद्धकोष्ठता
  • लक्ष केंद्रित करण्यात अडचण किंवा विसरभोळेपणा
  • कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन वाढणे, वेळेत उपचार न झाल्यास हायपोथायरॉईडीझममुळे हृदयविकार, वाढलेले कोलेस्टेरॉल, वंध्यत्व आणि गंभीर मेटाबॉलिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. काही गंभीर परिस्थितींमध्ये हा आजार जीवघेणाही ठरू शकतो.

हायपरथायरॉईडीझम (Hyperthyroidism): कारण नसताना वजन कमी होणे

हायपरथायरॉईडीझममध्ये थायरॉईड ग्रंथी गरजेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार करते.
यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम खूप वेगाने काम करू लागतो. शरीर जास्त प्रमाणात कॅलरीज जाळत असल्याने कोणताही प्रयत्न न करता वजन झपाट्याने कमी होऊ शकतं.

याची प्रमुख लक्षणे:

  • सतत अस्वस्थ किंवा घाबरल्यासारखं वाटणं
  • खूप घाम येणे आणि उष्णता सहन न होणे
  • हृदयाचे ठोके वेगाने धडधडणे किंवा धडधड जाणवणे
  • वारंवार शौचास होणे
  • कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणे
जर सहा ते बारा महिन्यांत शरीराच्या एकूण वजनाच्या 5% पेक्षा जास्त किंवा सुमारे 10 पौंड (साडेचार किलो) पेक्षा जास्त वजन कमी झाले, विशेषतः तुमचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर ते चिंतेचं कारण ठरू शकतं. सामान्यतः दिवसागणिक वजनात थोडाफार फरक होत असतो, पण तो साधारणपणे पाच पौंडांच्या मर्यादेत असतो. त्यापेक्षा जास्त वजन कोणताही प्रयत्न न करता कमी होत असेल, तर त्यामागे दुसरं एखादं गंभीर कारण असू शकतं. अशा प्रकारचं वजन कमी होणं हे मधुमेह, अॅडिसन्स रोग किंवा काही प्रकारचे कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचंही लक्षण असू शकतं. वेळेत उपचार न झाल्यास हे आजार अधिक गंभीर होऊ शकतात.

लवकर निदान का महत्त्वाचं आहे?

थायरॉईडचे आजार हळूहळू विकसित होतात. त्यामुळे त्यांची लक्षणे अनेकदा ताणतणाव, वाढतं वय किंवा जीवनशैलीशी संबंधित थकवा समजून दुर्लक्षित केली जातात.

उपचार न घेतल्यास थायरॉईडमधील बिघाडामुळे खालील समस्या उद्भवू शकतात:

  • कोलेस्टेरॉल वाढणे
  • हृदयविकार
  • वंध्यत्व
  • मासिक पाळीतील अनियमितता
  • ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे)
  •  चिंता आणि नैराश्य
  •  गंभीर मेटाबॉलिक गुंतागुंत
वेळेत निदान आणि योग्य उपचारांमुळे हार्मोन्सचं संतुलन पुन्हा प्रस्थापित करता येतं आणि जीवनमान सुधारण्यास मदत होते.
लवकर निदानासाठी कोणत्या चाचण्या केल्या जातात?

थायरॉईड फंक्शन टेस्ट (TFT)
• TSH (Thyroid Stimulating Hormone)
• Free T3
• Free T4

याशिवाय काही वेळा खालील चाचण्याही सुचवल्या जाऊ शकतात:

  • Anti-TPO Antibodies
  • थायरॉईड अल्ट्रासाऊंड
  • थायरॉईड अँटीबॉडी प्रोफाइल, या चाचण्यांच्या मदतीने थायरॉईड कमी कार्यरत आहे का, जास्त कार्यरत आहे का किंवा त्यामागे
  • ऑटोइम्यून आजार आहे का, हे समजू शकतं.

बहुतेक थायरॉईडचे आजार योग्य उपचारांनी प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येतात.यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

  • औषधोपचार, जीवनशैलीत आवश्यक बदल
  • संतुलित आहार
  • नियमित तपासणी
  • ताणतणावाचं व्यवस्थापन
योग्य उपचार घेतल्यास अनेक व्यक्तींमध्ये वजन स्थिर राहतं, ऊर्जा वाढते आणि दीर्घकालीन आरोग्यही सुधारतं. हायपोथायरॉईडीझमकडे दुर्लक्ष केल्यास काही परिस्थितींमध्ये हा आजार जीवघेणाही ठरू शकतो.

World Breastfeeding Week: बाळाच्या उत्तम आरोग्याची सुरुवात आईपासून! बाळंतपणानंतर महिलांना उत्तम पाठबळ देण्याचे पाच मार्ग

निष्कर्ष:

जर तुमचं किंवा तुमच्या ओळखीतील एखाद्या व्यक्तीचं वजन अचानक वाढत असेल किंवा कमी होत असेल, सतत थकवा जाणवत असेल किंवा मनःस्थितीत बदल जाणवत असतील, तर याकडे दुर्लक्ष करू नका.थायरॉईड ग्रंथी आकाराने लहान असली तरी तिचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होणारा परिणाम खूप मोठा असतो.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: थायरॉईडची सुरुवातीची लक्षणे कोणती असू शकतात?

    Ans: अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, सतत थकवा, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे, बद्धकोष्ठता, हृदयाचे ठोके वाढणे किंवा कमी होणे, जास्त घाम येणे, थंडी किंवा उष्णता सहन न होणे आणि मूडमध्ये बदल ही काही सामान्य लक्षणे असू शकतात.

  • Que: वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे हे थायरॉईडचे लक्षण असू शकते का?

    Ans: होय. थायरॉईड हार्मोन्सच्या असंतुलनामुळे शरीराच्या चयापचयावर (Metabolism) परिणाम होतो. त्यामुळे काही व्यक्तींमध्ये वजन वाढू शकते, तर काहींमध्ये अनपेक्षित वजन घटू शकते.

  • Que: थायरॉईडची तपासणी कोणती करावी?

    Ans: थायरॉईडची समस्या असल्याचा संशय असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने TSH, Free T3 आणि Free T4 या रक्त तपासण्या केल्या जातात. काही प्रकरणांमध्ये इतर तपासण्यांचीही आवश्यकता असू शकते.

Web Title: Sudden weight gain or weight loss dont ignore these warning signs of thyroid disorder get tested on time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Doctor advice
  • Health Care Tips
  • thyroid care

संबंधित बातम्या

Benefits Eating Cherries: चेरी ठरेल सुपरफूड! रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेवर येईल चमकदार ग्लो
1

Benefits Eating Cherries: चेरी ठरेल सुपरफूड! रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेवर येईल चमकदार ग्लो

बीट कच्चे खावे की शिजवून? जाणून घ्या बीट खाण्याचे योग्य प्रमाण, पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे
2

बीट कच्चे खावे की शिजवून? जाणून घ्या बीट खाण्याचे योग्य प्रमाण, पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे

पावसाळ्यातील दूषित पाणी शरीरासाठी ठरेल जीवघेणे! आजारांपासून बचाव करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा पाण्याचे सेवन
3

पावसाळ्यातील दूषित पाणी शरीरासाठी ठरेल जीवघेणे! आजारांपासून बचाव करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा पाण्याचे सेवन

Gums Health: ब्रश करताना हिरड्यांतून रक्त येतंय? जाणून घ्या त्यामागची गंभीर कारणे
4

Gums Health: ब्रश करताना हिरड्यांतून रक्त येतंय? जाणून घ्या त्यामागची गंभीर कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.