डार्क सर्कल्सच्या समस्येने त्रस्त आहात? चमचाभर दह्यात मिक्स करा 'हा' प्रभावी पदार्थ
कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासह त्वचा आणि केसांवर लगेच दिसून येतो. याशिवाय अपुऱ्या झोपेमुळे महिलांसह पुरुषांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळ येऊ लागतात. चेहऱ्यावर आलेले डार्क सर्कल्स त्वचेचे तारुण्य पूर्णपणे कमी करून टाकतात. त्यामुळे त्वचेची गुणवत्ता काहीशी खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. डार्क सर्कल्स आल्यानंतर ते घालवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. कधी महिला वेगवेगळ्या क्रीम लावतात तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करून चेहऱ्यावर आलेले डार्क सर्कल्स घालवले जातात. मात्र कोणत्याही प्रॉडक्टचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे त्वचा अधिक निस्तेज होऊन जाते.
कमी वयात केस होत आहेत सफेद? बाबा रामदेवांनी दिले 5 सोपे उपाय, पांढरे केसही होतील काळे
वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे लक्ष देऊन त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, वांग येणे, त्वचेची गुणवत्ता खराब होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले डार्क सर्कल्स घालवण्यासाठी दह्यात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे तुमच्या त्वचेवर आलेले डार्क सर्कल्स कमी होऊन त्वचा चांगली दिसू लागेल.
चेहऱ्यावर आलेले डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी दह्याचा वापर करावा. दह्यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा कायम सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत होते. यासाठी वाटीमध्ये दही घेऊन सातूचे पीठ टाकून मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेले मिश्रण डोळ्यांखाली किंवा संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर काही वेळ दह्याचे मिश्रण चेहऱ्यावर तसेच ठेवून द्या. यामुळे काळी झालेली त्वचा उजळण्यास मदत होईल. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास डार्क सर्कल्समुळे निस्तेज झालेली त्वचा सुधरण्यास मदत होईल.
ब्लड प्रेशर पण High, आणि शुगर पण जास्त! सुरु करा ‘हे’ डाएट…
सातूच्या पिठाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय चेहऱ्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. सातूचे पिठाचे सेवन केल्यामुळे शरीरात कॉलेजीनचे प्रमाण वाढवण्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. सातूच्या पिठामध्ये असणारे ग्लायसिन आणि प्रोलाइन इत्यादी आवश्यक घटक शरीराला पोषण देण्यासाठी आवश्यक ठरतात.