उन्हामुळे चेहरा काळवंडला आहे? दुधाच्या सायीमध्ये मिक्स करा 'हा' पदार्थ, आठवडाभरात त्वचेवर येईल चमकदार ग्लो
सुंदर दिसण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा सतत काहींना काही करत असतात. चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिंपल्स, मोठे फोड, सुरकुत्या घालवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कायमच महागडी सप्लिमेंट्स, स्किन केअर प्रॉडक्ट आणि वेगवेगळ्या क्रीमचा वापर केला जातो. कामाच्या धावपळीमध्ये महिला त्वचेची काळजी घेत नाहीत. जीवनशैलीत सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि कौटुंबिक जबाबदारी इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स काही केल्यास लवकर कमी होत नाहीत. वारंवार त्वचा गोरीपान करण्यासाठी घेतलेल्या सप्लिमेंट्समुळे वाढत्या वयात त्वचेला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला कायमच बाजारातील महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. पण यामुळे त्वचा काही काळापुरती सुंदर दिसते. पण कालांतराने त्वचा होती तशीच होऊन जाते. त्यामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला काळवंडलेला चेहरा पुन्हा उजळदार करण्यासाठी दुधाच्या सायीमध्ये कोणता पदार्थ मिक्स करून लावावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर. दुधाची साय चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा खूप जास्त सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते.
दुधाची साय कधीच चेहऱ्यावर थेट लावू नये. यामुळे त्वचा तेलकट होऊन चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. दुधाच्या सायीमध्ये नैसर्गिक स्वरूपात लॅक्टिक ऍसिड असते. ज्यामुळे त्वचा जेंटली एक्सफोलिएट राहण्यास मदत होते. उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि त्वचेवर वाढलेल्या मृत पेशी कमी करण्यासाठी दुधाच्या सायीचा वापर करावा. यामुळे त्वचा हळूहळू उजळदार होण्यास मदत होते. दुधाच्या सायीतील फॅट्स त्वचेला आतून मॉईश्चराईज ठेवण्यास मदत करतात. त्वचा जास्त मऊ, हेल्दी आणि हायड्रेटेड होण्यासोबतच सुंदर सुद्धा होते.
वाटीमध्ये दुधाची साय घेऊन त्यात बटाट्याचा रस मिक्स करा. तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर काहीवेळ ठेवून नंतर त्वचा पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करून घ्या. त्वचा धुवताना सौम्य फेसवॉशचा वापर करावा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्वचेवर दुधाची साय लावल्यास चेहरा अतिशय उजळदार आणि गोरापान होण्यास मदत होईल. चेहऱ्यावर आलेले डाग, पिग्नेंटेशन किंवा टॅनिंग कमी करण्यासाठी दुधाच्या सायीचा वापर करावा. तसेच बटाट्याचा रस त्वचेला हायड्रेट आणि काळे डाग कमी करण्यास मदत करतो.






