Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी

Small Prawns Recipe : अनेक आगरी घरांमध्ये ओल्या करदीची भाजी आणि तांदळाची भाकरी हे काॅम्बीनेशन फार फेमस आहे. पारंपारिक मसाल्यात परतून या भाजीला खरपूस शिजेपर्यंत तयार केले जाते ज्यामुळे याची चव काही वेगळीच लागते. तुम्हाला मासे खायला आवडत असतील तर ही रेसिपी एकदा जरुर करुन पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 19, 2026 | 09:09 AM
Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी

Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • ओली करदी जिला स्माॅल प्राॅन्स असंही म्हटलं जातं.
  • याची सुक्की भाजी चवाला फार अप्रतिम लागते.
  •  आगरी संस्कृतीत ही भाजी आवडीने खाल्ली जाते.
आगरी खाद्यसंस्कृतीत समुद्री खाद्यपदार्थांना विशेष स्थान आहे. त्यापैकी ओल्या करदीची आणि छोट्या कोळंबीची भाजी हा अतिशय चविष्ट आणि पारंपरिक पदार्थ मानला जातो. ताजी ओलसर करदी (लहान कोळंबी) आणि सुगंधी मसाल्यांचा अप्रतिम संगम या भाजीला वेगळीच चव देतो. ही भाजी तिखट, रसाळ आणि मसालेदार असल्यामुळे गरम भाकरी, तांदळाची भाकरी किंवा वाफाळलेल्या भातासोबत अप्रतिम लागते. घरगुती पद्धतीने कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी आगरी संस्कृतीतील अनेक घरांमध्ये आवर्जून केली जाते. तुम्ही फिश लव्हर्स असाल तर ही रेसिपी तुम्हाला पसंत पडेल याची आम्हाला खात्री आहे. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कॅफे स्टाईल मसाला मॅक्रोनी पास्ता, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

साहित्य :

  • ओली करंदी: २५० ग्रॅमबारीक
  • चिरलेला कांदा: २ मोठे
  • आलं-लसूण-अद्रक पेस्ट : १ चमचा
  • हळद: १/२ चमचा
  • गरम मसाला : १/२ चमचा
  • लाल तिखट/आगरी मसाला  : १ चमचा
  • चिरलेली कोथिंबीर
  • तेल
  • चवीनुसार मीठ
Recipe : कॅफे स्टाईल चिकन कोल्ड सँडविच बनवा घरच्या घरी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

कृती 

  • यासाठी सर्वप्रथम ओली करदी पाण्यातून २-३ वेळा स्वच्छ धुऊन घ्या. त्यातील बारीक सडलेले भाग आणि कचरा काढून टाका. पाणी निथळण्यासाठी ती एका चाळणीत ठेवा.
  • कढईत तेल गरम करा आणि आलं-लसूण-अद्रक पेस्ट घालून १ मिनिट परतून घ्या
  • आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला आणि कांदा मऊ होईपर्यंत (गुलाबी रंगावर) परता.
  • कांदा परतल्यावर त्यात हळद, गरम मसाला आणि लाल तिखट घालून चांगले मिक्स करा.
  • यामध्ये साफ केलेली ओली करदी घाला. चवीनुसार मीठ टाका. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर १० ते १५ मिनिटे भाजी शिजू द्या. (करदी खूप लवकर शिजते, त्यामुळे जास्त वेळ शिजवू नये).
  •  शेवटी झाकण काढून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा आणि भाजी कोरडी (सुक्की) होईपर्यंत आणखी १ मिनिट
  • परतून गॅस बंद करा.
  • गरमागरम ओल्या करदीची सुक्की भाजी तांदळाची भाकरीसोबत चवीला अप्रतिम लागते. तुम्ही चपातीसोबतही याचा आस्वाद घेऊ शकता.
 

Web Title: Sunday special agri koli style kardi small prawn recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा
1

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी
2

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट
3

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
4

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.