हिपॅटायटीस हा यकृताचा एक दाह असून तो हिपॅटायटीस विषाणूमुळे होतो. त्यामुळे शरीरातील ऊतींना दुखापत किंवा संसर्ग झाल्यास सूज येते. यामुळे शरीरातील इतर अवयवांचेही नुकसान होते. विविध अभ्यासांनुसार, हिपॅटायटीस ए, बी,सी,डी आणि ई यासह अनेक प्रकारचे विषाणू हिपॅटायटीसला कारणीभूत आहेत. शिवाय, एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेद्वारे, दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे हेपटायटस ए आणि हिपॅटायटीस ई संसर्ग होऊ शकतो.
जेव्हा संक्रमणाचा प्रश्न येतो तेव्हा, हिपॅटायटीस ए आणि ई दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे होऊ शकतो, तर हिपॅटायटीस बी आणि सी रक्त किंवा शारीरिक द्रवाद्वारे प्रसारित केले जातात. हिपॅटायटीस डी संसर्ग हा फक्त हिपॅटायटीस बी ची लागण झालेल्यांनाच होऊ शकतो. व्हायरल हिपॅटायटीसपासून बचाव करण्यासाठी पुरेशी खबरदारी घेणे ही काळाची गरज आहे.
[read_also content=”जवसाच्या बियांमध्ये फायबर आणि ओमेगा -३ चा उत्तम सोर्स, शरीरासाठी ठरतील वरदान https://www.navarashtra.com/lifestyle/an-excellent-source-of-fiber-and-omega-3-in-flaxseeds-boons-for-the-body-nrsk-533683.html”]
हिपॅटायटीस असणा-या व्यक्तींना अनेकदा भेदभाव आणि गैरसमजूतीचा सामना करावा लागतो, ज्यामुळे एकटेपणा आणि लज्जास्पद भावना निर्माण होते. व्हायरल हेपेटायटीस हा रक्त संक्रमणाद्वारे किंवा बाळाच्या जन्मादरम्यान देखील हा संसर्ग होऊ शकतो. या संसर्गाबाबत असलेल्या गैरसमजूतींना दूर करणे आणि विषाणूजन्य हिपॅटायटीसबद्दलच्या योग्य माहिती देत लोकांना याबाबत साक्षर करणे गरजेचे आहे.
गंभीर स्वरूपाच्या हेपेटायटीस (हेपेटायटीस बी आणि सी) मध्ये दीर्घकालीन गुंतागुंत रोखण्यासाठी लवकरात लवकर निदान आणि उपचार होणे आवश्यक आहे. विषाणूजन्य हेपेटायटीसचे निदान जर विषाणूने यकृतावर परिणाम करण्याच्या आधी झाले तर हा आजार बरा करण्यासाठी प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. काही केसेसमध्ये जर यकृताचे गंभीर नुकसान आधीच झालेले असेल तर यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता भासू शकते.
[read_also content=”नाभीत खोबरेल तेल लावणे फायदेशीर! जाणून घ्या कारणे, तज्ज्ञांनी दिला सल्ला https://www.navarashtra.com/lifestyle/applying-coconut-oil-on-the-navel-is-beneficial-know-the-reasons-advised-by-experts-533641.html”]
प्रतिबंध कसा कराल?
१. जागरूक रहा.
२. नेहमी शुद्ध पाणी प्या, शौचालय, घर, आजूबाजूचा सर्व परिसर कायम स्वच्छ ठेवा.
३. सर्वांचे लसीकरण झालेले असणे महत्त्वाचे आहे.
४. रक्त व रक्त उत्पादनांची सुरक्षा अबाधित राखली जावी.
५. असुरक्षित लैंगिक संबंध ठेवू नयेत.
डॉ अमीत मांडोत, प्रमुख – डिपार्टमेंट ऑफ एडल्ट हिपॅटोलॉजी आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशन, ग्लेनईगल्स हॉस्पिटल, परेल