
पांढऱ्या भातातून शरीराला मिळेल विटामिन B-12! उन्हाळ्यात पारंपरिक पद्धतीने बनवा 'हा' चविष्ट पदार्थ, पचनक्रिया राहील मजबूत
विटामिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे?
विटामिन बी १२ वाढवण्यासाठी काय खावे?
भात कांजी बनवण्याची सोपी रेसिपी?
दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी शरीराला सर्वच घटकांची सारखीच आवश्यकता असते. विटामिन सी, विटामिन ई, विटामिन डी, विटामिन बी १२ घटक शरीराला भरपूर पोषण देतात. पण धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा अभाव शरीरात निर्माण झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शरीरात विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर थकवा, अशक्तपणा आणि मज्जासंस्थेसंबंधित समस्या उद्भवू लागतात. विटामिन बी १२ शरीरासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. शरीरात रक्तपेशीची वाढ करणे, डिएनए तयार करणे आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी शरीरात आवश्यक प्रमाणात विटामिन बी १२ असणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला विटामिन बी १२ ची पातळी वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थाचे आहारात सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
१० दिवस चहा कॉफी पिणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ बदल, सुधारेल झोपेची गुणवत्ता
थकवा, अशक्तपणा
खूप जास्त झोप येणे
दात हिरड्यांमध्ये वेदना
हाडांमध्ये वेदना आणि कटकट आवाज
मज्जासंस्थेसंबंधित आजार
शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर मांसाहारी पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. पण असे नसून शाहाकारी पदार्थांचे सेवन करून सुद्धा शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढू शकता. दैनंदिन आहारात भातापासून बनवलेल्या दही कांजीचे सेवन करावे. याला दही भात सुद्धा म्हंटले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट आणि फ्रेश ठेवण्यासाठी दही भात खावा. महिनाभरात आहारात दही भात किंवा भातापासून बनवलेल्या कांजीचे सेवन केल्यास शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होईल. दही खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांमध्ये चांगले विषाणू वाढण्यास मदत होते.
भात कांजी बनवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये, मोठ्या वाटीमध्ये भात घेऊन त्यात एक ते दोन ग्लास ताक मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण रात्रभर ठेवून द्या. सकाळी दह्याच्या मिश्रणात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कांदा, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. भाताची चव आणखीनच वाढवण्याची तुम्ही फोडणी सुद्धा देऊ शकता. रात्रभर ठेवलेल्या भातामध्ये लॅक्टोबॅसिलस सारखे बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे शरीराला फायदे होतात. कांजी तयार करण्यासाठी शक्यतो मातीच्या भांड्याचा वापर करावा. महिनाभर नियमित भात कांजी खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळेल.
Ans: फर्मेंटेड किंवा पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या काही भाताच्या पदार्थांमधून शरीराला उपयुक्त पोषक घटक मिळू शकतात.
Ans: होय. असे पदार्थ शरीराला थंडावा देण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करू शकतात.
Ans: पेज, दहीभात, आंबील आणि फर्मेंटेड भाताचे पदार्थ शरीराला हलके आणि थंड ठेवण्यास मदत करू शकतात.