(फोटो सौजन्य: Pinterest)
EPFO पेन्शन धारकांसाठी खुशखबर! पेन्शन खात्यात जमा झाला की नाही ? आता घरबसल्या मिळवा संपूर्ण माहिती
भारताची सेफ्टी स्टँडर्ड ऑथोरिटी FSSAI ने अलिकडेच एक एडव्हाझरी जारी केली आहे. यात लोकांनी उन्हाळ्याच्या काळात भाज्या घरी जास्तीत जास्तीत वेळ स्टोर कशा करुन ठेवायच्या यासाठीच्या काही टिप्स सांगण्यात आल्या आहेत. योग्य पद्धतीने भाज्या साठवून ठेवल्यास त्यातील पोषक घटक नष्ट होत नाहीत आणि भाज्या दिर्घकाळापर्यंत ताज्या राहतात.
क्लिनिंग करा
हिरव्या भाज्या स्टोर करण्याआधी त्यांना स्वच्छ करा. हिरव्या भाज्यांमध्ये बरीच घाण आणि किटक असण्याचा धोका असतो ज्यामुळे त्यांना घरी आणल्यानंतर लगेच धूवुन टाकावे. भाज्या निसून मग पाण्याने त्यांना स्वच्छ धुवा आणि मग त्यांना पसरवून सुकवा. लक्षात घ्या, पालेभाज्या दोन ते तीन दिवसांत खाऊन टाकाव्यात अन्यथा त्या खराब होऊ शकतात.
पेपरटॉवलचा वापर
दुसरी स्टेप म्हणजे भाज्यांना धुवून सुकवल्यानंतर त्यांना पेपरटॉवल गुंडाळून मग फ्रिजमध्ये ठेवा. हा कागद रेफ्रिजरेटरमधील आर्द्रतेपासून भाज्यांना वाचवेल आणि थंड ठेवेल जेणेकरुन त्या खराब होणार नाहीत. भाज्या गुंडाळून ठेवण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करणे टाळावे यामुळे प्रिंटेड शाईतील घटक भाज्यांमध्ये मिसळण्याची शक्यता असते ज्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
Travel News : पाण्यामध्ये तरंगणारं नॅशनल पार्क, इथे होडीत बसून केली जाते जंगल सफारी






