फोटो सौजन्य - Social Media
कांदिवलीमध्ये स्थित असलेल्या एका फ्लॅटमध्ये अनेक चित्र विचित्र गोष्टी घडतात. अनेकांना याविषयी ठाऊक आहे, ते या फ्लॅटच्या शेजारून फिरकण्यासही घाबरतात. पण ज्यांना माहीत नाही, ते फसले जातात. राघव आणि माया, दोघे एकाच ठिकाणी कामाला होते. ऑफिसमध्येच त्यांच्यात प्रेम झालं आणि पुढे जाऊन दोघांनी लग्न केलं. दोघांना ऐसपैस राहण्याची आवड होती. कांदिवलीच्या एका प्रिमिअम सोसायटीमध्ये एक आलिशान घर त्यांनी राहण्यासाठी निवडला. दोघांनाही पैसे बचत करण्याची फार काही सवय नव्हती. सगळं सुखात, ऐषोआरामात सुरु होतं. राघव जवळच असणाऱ्या एका मॉलमध्ये शिफ्ट झाला होता. तर माया घरी बसून कामे करत होती.
सुरुवातीच्या दिवसात राघव सकाळी ९ वाजता जॉबसाठी जात होता आणि रात्री ९ ला परतत होता. तर माया घरी बसून कामे करत असताना दुपारच्या जेवणाची वेळ होताच तिने लॅपटॉप बंद केला. त्याचवेळी तिच्या मागून एक बाई पास झाली, असे काही चित्र लॅपटॉपच्या स्क्रीनवर दिसली. बाई धावत किचनमध्ये गेली. ही तिच्या मागे मागे गेली पण आत कोणी नव्हतं पण एक विचित्र सुगंध आतून येत होता. राघव आल्यावर त्याला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. राघवने देखील सारखा सुगंधाचा अनुभव घेतला होता. त्याने सांगितले की पहाटे, जेव्हा माया गाढ झोपेत होती तेव्हा त्याने अंघोळीला जात असताना आत नुकताच वापरलेला साबण पाहिला आणि सारखाच सुगंध येत होता. तरी राघवने माया घाबरू नये म्हणून हा विषय जास्त लांबणीवर नेला नाही.
सुखाचा आठवडा घालवून राघव आणि माया झोपलेले असताना मायाला अचानक जाग आली. माया लॅपटॉपवर कामे करू लागलीय. इतक्यात तिने पाहिले की किचनमध्ये कुणीतरी फ्रिज सुरु करतोय आणि बंद करतोय. फ्रिजची लाईट सारखी चालू बंद होत होती. माया धावत धावत आतमध्ये गेली पण किचनमध्ये कुणी नव्हतं. मायाने फ्रिज उघडून बंद केला आणि मागे वळताच तिला एक काळीकुट्ट बाई दिसली. ती तिच्याकडे पाहत होती. तिच्या धुळीने माखलेल्या जुनाट कपड्यातून दुर्गंध येत होता. ती बाई मायाला म्हणाली “काहीतरी खायला दे!” एकदा नव्हे तर दोनदा तिने म्हंटले “ताई, काहीतरी खायला दे!” माया तशीच बेडरूमकडे पळाली.
राघवही जागा झाला. तोही किचनकडे पळाला पण तिथे कुणी नव्हतं. शेवटी मायाला शांत करत दोघे झोपी गेले. मायाला झोप काही लागली नाही, सकाळ होताच ती किचनकडे आली. किचनखाली उष्ट अन्नाची प्लेट पडली होती. मायाने ती उचलून घासून ठेवली आणि राघव उठताच त्याची शाळा घेतली. पण राघव म्हणाला की मी उठलोच नाही. मी नाही खाल्लं ते! तरी मायाला शांत करत, राघव कामाला गेला.
महिनाभर त्या दोघांना कसलाही अनुभव आला नाही. सगळं काही अगदी खुशाल होतं. पण एकेदिवशी राघव कामावरून घरी आला तेव्हा मायाला एका वेगळ्याच आनंदात पाहिलं. राघवला प्रश्न आला, हिला का इतका आनंद झालाय? माया म्हणाली की राघव तू बाई ठेवल्यामुळे मला कसलेही काम करावे लागत नाही. राघवच्या चेहऱ्यावर घाम सुटतो तो बाई कुठे आहे विचारतो. माया म्हणते किचनमध्ये! राघव तशाच किचनकडे पळत जातो आत कुणीतरी असल्याची त्याला चाहूल लागते. इतक्यात कुणीतरी दार बेल वाजवतो. राघव दार उघडतो. शेजारी राहणाऱ्या बाई चार महिन्यांच्या सुट्टीनंतर घरी परतल्या असतात. त्या राघवला सांगतात. मला नाही माहित हे घर कधी भाड्यावर गेले. पण तुम्हाला माहिती आहे का? चार महिन्यापूर्वी इथे एका कामवाली बाईचा खून झाला होता. बेडरूममध्ये उपासमारीमुळे तिचा मृतदेह आढळला. राघवने तिला बाईचे नाव विचारले असता “सावित्री” म्हणून उत्तर येत. राघव तशाच मायाकडे जातो आणि आनंदित असलेल्या मायाला धरून विचारतो बाईचा नाव सांग. माया सांगते “सावित्री”!
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)