पुणे : शंकरांनी स्वत: सगळं विष पिऊन मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्र प्रकाशात म्हणजेच त्या पौर्णिमा रात्री शंकराचे गुणगान गायले गेले, म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. या रात्री जो कोणी भगवान शंकराची आराधना करेल त्याच्यावर ते नेहमी कृपादृष्टी ठेवतात असा समज आहे म्हणूनच या दिवशी लोक शंकराची पूजा करतात.
जेजुरी गडावर मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या बाजूस छोट्या दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर खाली एक माणूस उतरू शकेल इतके छोटे तळघर आहे. तेथे हे गुप्त शिवलिंग आहे ते वर्षातून फक्त एकदा महाशिवरात्रीला उघडले जाते. शिवपार्वतीने कैलासानंतर पृथ्वीतलावर वास्तव्य केलेले एकमेव ठिकाण म्हणजे जेजुरी (जयाद्री) पर्वत असे म्हटले जाते.
[read_also content=”भगवान शंकराला आवडते बेलपत्र, या आयुर्वेदिक झाडाची पाने चघळल्याने दूर होतील Diabetes सारखे ५ घातक आजार https://www.navarashtra.com/lifestyle/mahashivratri-know-5-surprising-health-benefits-of-chew-bel-patra-or-bilva-leaves-know-the-full-story-details-in-marathi-nrvb-246154/”]
खंडोबाच्या मुख्य उत्सवापैकी महाशिवरात्रीला वेगळे महत्व आहे. त्रिलोकातील दर्शनाचा लाभ यावेळी घेता येतो. मंदिराच्या शिखरातील शिवलिंगाला स्वर्गलोक तर मुख्य मंदिरातील स्वयंभूलिंगाला भूलोक व गाभार्यातील भुगर्भात असलेल्या शिवलिंगाला पाताळलोक समजले जाते.
यंदा सुप्रिया सुळे यांनी या दिवसाचे औचित्य साधून श्री क्षेत्र खंडेरायाचे दर्शन घेतले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडेरायाचे श्रीक्षेत्र जेजुरी येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शन घेतले.
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏 pic.twitter.com/ufc42lq6KT— Supriya Sule (@supriya_sule) March 1, 2022