Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुण वयोगटातील महिलांमध्ये वाढतेय हृदयविकाराची समस्या! आनुवंशिक समस्येकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही दिवस शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. पण या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. महिलांमध्ये हृदय रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 22, 2026 | 01:01 PM
तरुण वयोगटातील महिलांमध्ये वाढतेय हृदयविकाराची समस्या! आनुवंशिक समस्येकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

तरुण वयोगटातील महिलांमध्ये वाढतेय हृदयविकाराची समस्या! आनुवंशिक समस्येकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

Follow Us
Follow Us:

मुंबई : पूर्वी हृदयविकाराचा झटका हा प्रामुख्याने वयोवृद्धांमध्ये दिसून येत होता. मात्र सध्या तरुणांमध्ये, विशेषतः ३०-४० वयोगटातील महिलांमध्ये, हृदयविकाराचा धोका वाढला आहे. महिलांकडून सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे निदान आणि उपचारास विलंब होतो. त्यामुळे तरुणांमधील वाढत्या हृदयविकाराच्या समस्येला कमी करण्यासाठी वेळीच तपासणी, कुटुंबातील वैद्यकीय इतिहासाबाबत जागरूक असणे आणि त्यानुसार प्रतिबंधात्मक काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.(फोटो सौजन्य – istock)

जागतिक मलेरिया दिन का साजरा केला जातो? डासांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी अशा पद्धतीने घ्या काळजी

दक्षिण मुंबईत राहणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या ३५ वर्षीय ऋचा कुमार यांना दोन अपत्य देखील आहेत. या स्वतःला अगदी फिट समजत होत्या. शारीरीक थकवा आणि छातीत हलकासा त्रास अशी काही लक्षणे जाणवत असतानाही ती ताणतणाव, व्यस्त दिनचर्या आणि कामाच्या अतिरिक्त ताणामुळे होत असावीत असे समजून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. जानेवारी २०२६ मध्ये त्यांना छातीत वेदना आणि श्वास घेण्यास त्रास झाला आणि त्यांना हृदयविकाराच्या झटक्याचे निदान झाले. पुढील तपासणीत त्यांच्यात आनुवंशिकरित्या धोका असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या वडिलांना देखील ३५ व्या वर्षी हृदयविकाराची समस्या आली होती. तरीही त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही आणि नियमित हृदय तपासण्या देखील केल्या नाहीत. ८०% ब्लॉकेज असल्याने त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि चौथ्या दिवशी त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या त्या पूर्णपणे बऱ्या असून नियमित फॉलो-अपसाठी येत आहेत. त्यामुळे वेळेवर निदान आणि उपचार प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तसेच कुटुंबातील वैद्यकिय इतिहास समजून घेणे, नियमित तपासण्या करणे आणि हृदय निरोगी ठेवणे ही काळाची गरज आहे.

डॉ बिपीनचंद्र भामरे, (कार्डियाक सर्जन,सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई) म्हणाले, आम्ही तरुण भारतीयांमध्ये, विशेषतः ३० ते ४० वयोगटातील महिलांमध्ये, हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. यामध्ये वैद्यकीय इतिहासामुळे देखील मोठ्या प्रमाणात धोका आढळून येतो. अनेक व्यक्तींमध्ये स्थूलपणा किंवा धूम्रपान यांसारखे जोखीम घटक नसतानाही केवळ कुटुंबातील वैद्यकीय इतिहासामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. छातीत अस्वस्थता जाणवणे, थकवा येणे , श्वास घेण्यास त्रास होणे, तसेच जबड्यात किंवा पाठीमध्ये वेदना होणे या सामान्य लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, विशेषतः महिलावर्ग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळून येते. वेळेत उपचार न झाल्यास यामुळे हार्ट फेल्युअर (हार्ट फेल्युअर) किंवा पुन्हा हृदयविकाराचे झटका येण्याचा धोका वाढतो. कुटुंबात इतिहास असलेल्या व्यक्तींनी वेळीच तपासणी करणे, संतुलित आहाराचे सेवन करणे, दररोज व्यायाम करणे, तसेच योग आणि ध्यानाद्वारे ताणतणाव नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

लाल रक्तपेशींची पातळी कमी झाल्यामुळे होऊ शकतो ॲनिमिया, दुर्लक्ष न करता आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचा समावेश

डॉ सोनम तिवारी(रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपिक स्त्रीरोगतज्ज्ञ ग्लेनईगल्स हॉस्पिटल, परळ, मुंबई) म्हणाल्या, महिलांच्या हृदयाच्या आरोग्याकडे अनेकदा वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे दुर्लक्ष होते. महिलांमध्ये लक्षणं ही पुरुषांच्या तुलनेत वेगळी असू शकतात. हार्मोनल बदल, गर्भधारणेशी संबंधित समस्या आणि आनुवंशिक घटक यांचा हृदयावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी थकवा, मळमळ, पाठदुखी किंवा जबड्यातील वेदना यांसारख्या लक्षणांकडे लक्ष द्यावे. छातीत तीव्र वेदना होणे यासारखी लक्षणे अनेकदा महिलांमध्ये दिसून येतात ,परंतु ते अनेकदा अॅसिडिटी किंवा हार्टबर्न समजून त्याकडे दुर्लक्षित केले जाते. वेळीच उपचार केल्यास हार्ट फेल्युअर आणि जीवघेणा धोका टाळता येऊ शकतो. महिलांनी आपल्या कुटुंबातील वैद्यकीय इतिहासाची माहिती ठेवत हृदयाचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुण महिलांमध्ये हृदयविकार का वाढत आहेत?

    Ans: अनियमित जीवनशैली, ताणतणाव, चुकीचा आहार आणि आनुवंशिक कारणांमुळे हा धोका वाढत आहे.

  • Que: आनुवंशिक कारणांचा हृदयविकारावर कसा परिणाम होतो?

    Ans: कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असल्यास पुढील पिढीत हा धोका जास्त असतो.

  • Que: महिलांनी कोणत्या तपासण्या कराव्यात?

    Ans: ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, शुगर लेव्हल आणि ECG तपासणी नियमित करावी.

Web Title: The problem of heart disease is increasing in young women ignoring a genetic problem can be costly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • Doctor advice
  • Health Care Tips
  • heart attack awareness
  • Heart attack prevention

संबंधित बातम्या

Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान; आहारात करा समावेश
1

Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान; आहारात करा समावेश

Health Care Tips: स्मृतिभ्रंशावर नियमित योग अधिक प्रभावी! १२ आठवड्यांपर्यंत दररोज ६० मिनिटे योगसत्रामुळे बदल
2

Health Care Tips: स्मृतिभ्रंशावर नियमित योग अधिक प्रभावी! १२ आठवड्यांपर्यंत दररोज ६० मिनिटे योगसत्रामुळे बदल

घाटकोपर मेट्रो स्थानकावर ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ संकल्पनेवर हिरानंदानी हॉस्पिटलतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
3

घाटकोपर मेट्रो स्थानकावर ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ संकल्पनेवर हिरानंदानी हॉस्पिटलतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

आधुनिक उपचार पद्धतीने शरीराला मिळेल नवीन ताकद! अवयवांचे आरोग्य आणि पुनर्प्राप्तीसाठी सेल बेस थेरेपी का आहे फायदेशीर
4

आधुनिक उपचार पद्धतीने शरीराला मिळेल नवीन ताकद! अवयवांचे आरोग्य आणि पुनर्प्राप्तीसाठी सेल बेस थेरेपी का आहे फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.