जागतिक मलेरिया दिन का साजरा केला जातो? डासांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी अशा पद्धतीने घ्या काळजी
जगभरात दरवर्षी जागतिक मलेरिया दिन २५ एप्रिल रोजी साजरा केला जातो. मलेरिया आजराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी या दिवशी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. ज्याचा उद्देश लोकांना या गंभीर आजाराबद्दल जागरूक करणे आणि त्याच्या प्रतिबंधासाठी प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आहे.जागतिक मलेरिया दिन २०२६ ची संकल्पना आहे मलेरियाविरुद्ध एकजूट, ही संकल्पना मलेरिया प्रतिबंध आणि नियत्रणामध्ये सामूहिक कृतीचे महत्व अधोरेखित करते. ती सरकारे, आरोग्य सेवा संस्था, समुदाय आणि जागतिक भागीदार यांच्यातील सहकार्यावर भर देते. जनजागृतीचे प्रयत्न डास नियंत्रण, लवकर निदान आणि वेळेवर उपचार यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करतात.(फोटो सौजन्य – istock)
२००१ मध्ये हा दिवस आफ्रिका मलेरिया दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येक देशात मलेरिया दिन साजरा केला जाऊ लागला. डब्ल्यूएचओने याला जागतिक मलेरिया दिन असे नाव दिले. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २००७मध्ये हा दिवस सुरू केला, ज्याचा मुख्य उद्देश मलेरियाच्या जागतिक समस्येकडे लक्ष वैद्यणे आणि त्याच्या प्रतिबंधासाठी आणि नियंत्रणासाठी उपाययोजना करणे हा आहे. मलेरिया हा आजार भागात प्रामुख्याने उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय आढळतो, जिथे डासांचा प्रादुर्भाव जास्त असतो, ज्यामुळे या आजाराविरुद्ध लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे.
मलेरियाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे थडी वाजून येणे आणि उच्च ताप येणे. हा ताप अनेकदा सायकलमध्ये येतो, म्हणजे दर ४८ किंवा ७२ तासांनी पुन्हा येतो. तर काहीवेळा रुग्णाला तीव्र डोकेदुखी, थकवा आणि शरीरात अशक्तपणा जाणवतो.
स्नायूंमध्ये वेदना, मळमळ आणि उलट्या होणे हेही मलेरियाची लक्षणे आहेत.गंभीर प्रकरणांमध्ये लाल रक्तपेशींचा नाश झाल्याने अॅहनिमिया आणि कावीळ होऊ शकते.
रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर अवश्य करा, तसेच, विशेषतः मुलांसाठी डास प्रतिबंधक क्रीम किंवा स्प्रे वापरा, डास बहुतेकदा स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात प्रजनन करतात. म्हणून, भांडी, कूलर, टाक्या किंवा इतर उघड्या भांड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. आठवड्यातून एकदा स्वच्छ करा.घराभोवती पाणी साठू देऊर नये, कारण डास हे अशा ठिकाणी अंडी घालतात. गटारे आणि डबकी स्वच्छ ठेवावीत,संध्याकाळी बाहेर जाताना पूर्णप बाह्यांचा शर्ट आणि पूर्ण पँट घाला. डासांपासून स्वतःचे बचाव करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. हे विशेषतः मुलांसाठी आणि वृद्धांसाठी महत्वाचे आहे.
Ans: दरवर्षी २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो.
Ans: ताप, थंडी वाजणे, घाम येणे, डोकेदुखी, उलट्या आणि अंगदुखी ही सामान्य लक्षणे आहेत.
Ans: मच्छरदाणी वापरणे, पूर्ण अंग झाकणारे कपडे घालणे, घराभोवती पाणी साचू न देणे आणि मच्छर रिपेलेंट वापरणे.






