
सुप्त क्षय जीवाणूंवर न होणाऱ्या उपचाराचे रहस्य! उपचार पद्धतीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता
टीबीसारखा गंभीर आजार होण्याची कारणे?
टीबीच्या आजारांची लक्षणे?
क्षय उपचार पद्धतीत होणार मोठे बदल.
प्रभावी औषधे आणि व्यापक लसीकरण मोहीम असूनही क्षयरोगावर पूर्ण नियंत्रण मिळवणे अजूनही आव्हानात्मक ठरत आहे. उपचार सुरू असताना शरीरात सुप्त अवस्थेत लपून बसणाऱ्या टीबी जीवाणूंमुळे हा आजार पुन्हा डोके वर काढू शकतो. या सुप्त जीवाणूंना अँटिबायोटिक्सचा परिणाम कमी का होतो? याचे रहस्य अखेर उलगडल्याचे भारतीय संशोधकांनी दावा केला आहे. आयआयटी मुंबई आणि ऑस्ट्रेलियातील मोनॅश विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संयुक्त अभ्यासात याचे कारण स्पष्ट केले. क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने हा अभ्यास महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, असे संशोधकांचे मत आहे. (फोटो सौजन्य – istock)
दरम्यान मअवस्थेतील टीबी जीवाणू त्यांच्या बाह्य पटलात (सेल मेम्ब्रेन) बदल करून स्वतःभोवती एक प्रकारचे संरक्षण कवच तयार करतात. त्यामुळे अँटिबायोटिक्सचा पेशींमध्ये प्रवेश कमी होतो आणि औषधे प्रभावी ठरत नाहीत. हा अभ्यास केमिकल सायन्स या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला. या संशोधनाला भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान विभाग तसेच ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय आरोग्य संशोधन परिषदेकडून निधी प्राप्त झाला आहे.
रिफाब्युटिन, मॉक्सिफ्लॉक्सॅसिन, अमिकासिन आणि क्लेरिथ्रोमायसिन या टीबीच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची चाचणी करण्यात आली. सुप्त अवस्थेतील जीवाणूंवर परिणाम करण्यासाठी या औषधांचे प्रमाण सक्रिय जीवाणूंच्या तुलनेत दोन ते दहा पट वाढवावे लागले, असे संशोधकांनी सांगितले.
टीबीचे जीवाणू शरीरात सुरुवातीला सक्रिय असतात. मात्र काही काळानंतर ते सुप्त अवस्थेत प्रवेश करू शकतात. या अवस्थेत रुग्णाला कोणतीही लक्षणे नसतात आणि आजार पुढे पसरत नाही. मात्र रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास है जीवाणू पुन्हा सक्रिय होतात, प्राध्यापिका शोभना कपूर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी मायकोबॅक्टेरियम स्मेग्मॅटिस या निरुपद्रवी जीवाणूचा वापर करून हा अभ्यास केला. संशोधनात स्पष्ट झाले की सुप्त अवस्थेत जीवाणूंच्या पेशी पटलातील मेद पदार्थांची रचना बदलते आणि पटल अधिक कठीण व कमी भेद्य होत असल्याचे संशोधन केले.
सध्याची टीबी उपचार पद्धती सहा महिने किवा त्याहून अधिक काळ चालते. मात्र सुप्त जीवाणूंवर औषधांचा परिणाम कमी होत असल्याने उपचार अपुरे ठरतात आणि प्रतिकारक्षम टीबीची संख्या वाढते. या पाश्र्वभूमीवर संशोधकांनी सध्याच्या औषधांसोबत पेशी पटल शिथिल करणारे विशेष पेप्टाइ देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे अँटिबायोटिक्स पेशींमध्ये अधिक प्रभावीपणे प्रवेश करू शकतील अशी अपेक्षा आहे. सध्या हा अभ्यास प्रयोगशाळेत सुरक्षितरीत्या वापरता येणाऱ्या जीवाणूंवर करण्यात आला असून पुढील टप्प्यात खऱ्या टीबी जीवाणूंवर परीक्षण केले जाणार आहे.