वर्षअखेरची Best Trip! 'पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, नील आयलंड...'; IRCTC ने पर्यटकांसाठी जाहीर केले 'हे' खास पॅकेज ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Andaman Tour Package : डिसेंबर हा महिनाच प्रवासाचा. वर्षभराच्या धावपळीचा थकवा घालवण्यासाठी बरेच जण समुद्रकिनाऱ्यांच्या सहलीला ( Trip) प्राधान्य देतात. आणि याच प्रवासप्रेमींसाठी आयआरसीटीसीने (IRCTC) एक भन्नाट भेट जाहीर केली आहे अंदमानचे निसर्गरम्य सौंदर्य अनुभवण्यासाठी खास टूर पॅकेज! स्वच्छ निळे पाणी, स्वर्गासारखे बीच, ऐतिहासिक स्थळे आणि अप्रतिम बेटांचे सौंदर्य… हे सर्व एका प्रवासात पाहण्याची ही उत्तम संधी आहे.
आयआरसीटीसीने डिसेंबर 2025 मध्ये ‘अंदमान टूर पॅकेज’ लाँच करताच प्रवासप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे विशेष पॅकेज 2 डिसेंबर 2025 ते 8 डिसेंबर 2025 दरम्यान उपलब्ध असून, 6 रात्री आणि 7 दिवसांचा अविस्मरणीय प्रवास देणार आहे. याची सुरुवात उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून होणार आहे. समुद्रकिनारी सुट्टीची योजना आखणाऱ्या परिवारांसाठी, कपल्ससाठी, सोलो ट्रॅव्हलर्स आणि साहसप्रेमींसाठी हे पॅकेज अगदी योग्य आहे. वर्षाच्या अखेरीस स्वतःला ‘मे-टाइम’ देण्यासाठी आणि 2026 ला नवीन उर्जेसह सुरुवात करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो.
हे देखील वाचा : Children’s Day 2025: 14 आणि 20 नोव्हेंबर बालदिनमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या दोन्ही दिवसांचा इतिहास आणि अर्थ
या टूर पॅकेजमध्ये लखनऊ–पोर्ट ब्लेअर–लखनऊ असा रिटर्न एअरफेअर समाविष्ट आहे. म्हणजे प्रवासातील गुंतागुंत किंवा वेगळ्या बुकिंगची चिंता करावी लागणार नाही.
पूरे प्रवासात तुम्हाला आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामाची व्यवस्था देण्यात आली आहे. कुटुंबासह पर्यटनासाठी हे हॉटेल्स अगदी योग्य.
ब्रेकफास्ट आणि डिनरसह भोजनाची सोय असल्याने प्रवासादरम्यान कोणतीही अडचण राहणार नाही.
अंदमान म्हणजे स्वर्ग! आणि IRCTC या स्वर्गाचे सर्वात सुंदर तुकडे तुम्हाला दाखवणार आहे.
हे देखील वाचा : पृथ्वीचा सर्वात खालचा बिंदू आणि त्यातील जीवंत चमत्कार; वाचा का आहे जगाला ‘या’ महासागराचे इतके आकर्षण?
ब्रिटिशकालीन इमारतींचे अवशेष, हिरवाई आणि समुद्र यांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळेल.
स्कुबा डायव्हिंग आणि कोरल रीफ पाहण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांचे आवडते.
डिसेंबर हा अंदमानमध्ये पर्यटनाचा सर्वोत्तम काळ मानला जातो.
म्हणूनच, वर्षाअखेरची ही सुंदर सहल तुमच्या आठवणीत कायम राहील.
अंदमानचे मोहक समुद्रकिनारे, घनदाट हिरवाई असलेली बेटं आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे साक्षीदार असलेली ऐतिहासिक स्थळे… हे सर्व एका प्रवासात पाहणे म्हणजे स्वप्नच. IRCTC ने दिलेली ही सुवर्णसंधी तुमचा वर्षाअखेरचा आनंद द्विगुणित करू शकते.
Ans: हे पॅकेज 6 रात्री आणि 7 दिवसांचे आहे.
Ans: होय, रिटर्न फ्लाइट आणि 3-स्टार हॉटेल मुक्काम समाविष्ट आहे.
Ans: 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2025 या कालावधीत.






