Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women Health: ‘हे’ जीवघेणे आजार असतात सर्वच महिलांचे शत्रू! कोणत्याही वयात होऊ शकते लागण, वेळीच ओळख लक्षणे

वाढत्या वयात महिलांमध्ये अनेक गंभीर आजाराची लक्षणे दिसून येतात. या आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. हे आजार झाल्यानंतर शारीरिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 19, 2026 | 08:53 AM
'हे' जीवघेणे आजार असतात सर्वच महिलांचे शत्रू! कोणत्याही वयात होऊ शकते लागण

'हे' जीवघेणे आजार असतात सर्वच महिलांचे शत्रू! कोणत्याही वयात होऊ शकते लागण

Follow Us
Close
Follow Us:

महिलांमध्ये दिसून येणारे गंभीर आजार?
कोणत्या वयात महिलांना आजाराची लागण होते?
शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे कोणत्या समस्या उद्भवतात?

कामाची धावपळ, कौटुंबिक जबाबदाऱ्या, लहान मुलांचे संगोपन इत्यादी गोष्टींकडे लक्ष देताना महिला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे पूर्णपणे विसरून जातात. आरोग्याकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होते. वाढत्या वयात महिलांच्या शरीरात हार्मोन्स आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक गंभीर बदल दिसू लागतात. महिलांना कोणत्याही आजाराची लागण लगेच होते. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी. दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणारे बदल इत्यादींमुळे शरीराला हानी पोहचते. आज आम्ही तुम्हाला महिलांना दिसून येणारे कॉमन आजार कोणते? या आजारांची लक्षणे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

देशात फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढते! रिसर्चमधून आले निदर्शनास, आतापासून टाळा या चुका

महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा आजार म्हणजे अ‍ॅनिमिया. शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. मासिक पाळीतील बदल, मानसिक तणाव, चुकीचा आहार आणि सततची धावपळ इत्यादी अनेक गोष्टींमुळे महिलांचे आरोग्य बिघडून जाते. शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर चक्कर येणे, थकवा, केस गळणे आणि चेहरा फिकट दिसणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, डाळी, गूळ, खजूर इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.

वयाच्या ४० व्या वर्षानंतर महिलांमध्ये दिसून येणारा गंभीर आजार म्हणजे थायरॉईड. थायरॉईडची लागण झाल्यानंतर वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे, सतत थकवा, केस गळणे, चिडचिडेपणा, मासिक पाळी अनियमित होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे थायरॉईडची समस्या खूप जास्त वाढते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

तरुण वयातील मुलींमध्ये मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर पिंपल्स, केस गळणे किंवा जास्त केस येणे इत्यादी लक्षणे पीसीओएस झाल्यानंतर दिसून येतात. त्यामुळे मासिक पाळीतील लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. पीसीओएस झाल्यानंतर तो बरा करण्यासाठी जीवनशैलीत बदल, संतुलित आहार आणि व्यायाम केल्यास गंभीर समस्यांपासून आराम मिळतो.

नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

महिलांमध्ये दिसून येणारा अतिशय गंभीर आजार म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. महिलांमध्ये या कॅन्सरचे प्रमाण खूप जास्त दिसून येते. ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर छातीत गाठ जाणवणे, आकारात बदल, वेदना किंवा स्त्राव होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. मात्र तरीसुद्धा या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. याशिवाय महिलांना युरिन इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. जास्त वेळ लघवी थांबवून ठेवणे, लघवी करताना जळजळ, वेदना, वारंवार लघवी होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. शरीरात युरीन इन्फेक्शनची लक्षणे दिसू लागल्यानंतर वेळीच उपचार करणे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: योनीतून खाज येण्याची कारणे काय आहेत?

    Ans: साबण, डिटर्जंट्स किंवा स्वच्छता उत्पादनांची ऍलर्जी, हार्मोनल बदल (गर्भधारणा, रजोनिवृत्ती दरम्यान) यामुळे खाज येऊ शकते.

  • Que: गर्भाशयाच्या आरोग्यासाठी काय करावे?

    Ans: गर्भाशयाचे कार्य समजून घेणे, सामान्य विकारांची लक्षणे ओळखणे आणि नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

  • Que: अल्झायमरची लक्षणे काय आहेत?

    Ans: स्मरणशक्ती कमी होणे, नवीन गोष्टी शिकायला त्रास होणे, गोंधळ, मूड बदलणे आणि बोलण्यात अडचण येणे ही अल्झायमरची लक्षणे असू शकतात.

Web Title: These deadly diseases are the enemies of all women infection can occur at any age

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 08:53 AM

Topics:  

  • Breast Cancer
  • mental health
  • period
  • women health

संबंधित बातम्या

मानसिक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरेल आरोग्यदायी ‘लाफ्टर थेरपी’, कायमच राहाल आनंदी
1

मानसिक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरेल आरोग्यदायी ‘लाफ्टर थेरपी’, कायमच राहाल आनंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.