नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
मूळव्याध होण्याची कारणे?
मूळव्याध झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये?
शरीराच्या अंतर्गत अवयवांना होणाऱ्या आजरांच्या वेदना अतिशय तीव्र आणि जीवघेण्या असतात. त्यातील गंभीर समस्या म्हणून मूळव्याध. मूळव्याध झाल्यानंतर गुदद्वाराच्या आतील किंवा बाहेरील रक्तवाहिन्यांना सूज येते. ही सूज कालांतराने वाढते आणि खूप जास्त तीव्र वेदना होतात. शरीरात निर्माण झालेली फायबरची कमतरता, दीर्घकालीन बद्धकोष्ठता, शौचाच्या वेळी लावण्यात येणारा जोर इत्यादी गोष्टींमुळे मूळव्याध होतो. मूळव्याध झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, मात्र कालांतराने या लक्षणांकडे वाढ होते आणि संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते.
मूळव्याध हा आजार वारंवार होतो. त्यामुळे योग्य औषध आणि शरीरास आवश्यक असलेला आहार घेणे आवश्यक आहे. मूळव्याध झाल्यानंतर रुग्णाला उठताना, बसताना आणि विशेषतः मलविसर्जन करताना असह्य वेदना, आग आणि काहीवेळा रक्त पडण्याची भीती असते. रोजच्या आहारात अतितिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे मूळव्याध आणखीनच तीव्र होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मुळव्याधाच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिझ्झा, बर्गर, पास्ता किंवा मैद्यापासून बनवलेले पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण या पदार्थांमध्ये असलेला मैदा शरीरासाठी अतिशय घातक ठरतो. मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण अजिबात आढळून येत नाही. ज्यामुळे अन्नाचे पचन होण्यास अनेक अडथळे निर्माण होतात. कठीण मल बाहेर टाकताना गुदद्वारावर जास्तीचा तणाव येतो आणि काहीवेळा रक्त पडण्याची जास्त भीती असते. शरीरातील फायबरची कमतरता भरून काढण्यासाठी मैद्याऐवजी ओट्सचे सेवन करावे.






