Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mango Puranpoli Recipe: आंब्याचा गर आणि पुरणपोळीचा अनोखा संगम; आंब्याची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का?

उन्हाळा म्हणजे आंब्यांचा सीजन, या ऋतूत आंब्याचे अनेक पदार्थ बनवले जातात. अशात तुम्ही घरी टेस्टी आंब्याची पुरणपोळी तयार करू शकता. आंबा आणि पुरणपोळीचे हे कॉम्बिनेशन चवीला फार अप्रतिम लागते आणि सहज बनून तयारही होते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 17, 2025 | 09:38 AM
Mango Puranpoli Recipe: आंब्याचा गर आणि पुरणपोळीचा अनोखा संगम; आंब्याची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का?

Mango Puranpoli Recipe: आंब्याचा गर आणि पुरणपोळीचा अनोखा संगम; आंब्याची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का?

Follow Us
Close
Follow Us:

पुरणपोळी ही महाराष्ट्रीयन पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. ही एक गोड पोळी आहे जी डाळ आणि गूळ यांच्या मिश्रणाने भरलेली असते. पुरणपोळीला अनेक ठिकाणी विशेष महत्त्व आहे आणि ती विविध सणांमध्ये बनवली जाते. आपल्या घरी कोणताही खास प्रसंग असला किंवा सण-समारंभावेळी पुराणपोळी आवर्जून बनवली जाते. याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडते.

चिकन लव्हर्ससाठी खास; एकदा घरी नक्की बनवून पहा हॉटेल स्टाईल Afghani Chicken Tikka

गोडसर आंब्याचा गर आणि पुरणपोळी यांचा सुंदर संगम म्हणजे आंबा पुरणपोळी! उन्हाळा म्हणजे आंब्याचा सीजन, या ऋतूमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे येतात. अशात आंब्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. आंब्यापासून बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे आमरस मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही आंब्यापासून गोड अशी पुरणपोळी देखील बनवू शकता. विचार करा दोन महाराष्ट्रीयन गोड पदार्थांचे हे मिलन चवीला किती अप्रतिम लागेल. यंदाच्या उन्हाळ्यात ही अनोखी डिश एकदा नक्कीच बनवून पहा. जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • गव्हाचे पीठ – २ कप
  • मीठ – १ चिमूट
  • तेल – २ टेबलस्पून
  • पाणी – लागेल तसे
  • चण्याची डाळ – १ कप
  • साखर – ¾ कप
  • हापूस आंब्याचा गर – ½ कप
  • वेलदोडा पूड – ½ टीस्पून
  • जायफळ पूड – १ चिमूट
  • साजूक तूप – पोळी भाजायला
तोच तोच बोरिंग नाश्ता सोडा; घरी बनवा कुरकुरीत आणि मसालेदार Stuffed Bread Pakora

कृती

  • आंब्याची पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम गव्हाच्या पिठात मीठ, तेल टाकून मऊसर पीठ मळा आणि झाकून ३० मिनिटे ठेवून द्या
  • यानंतर चण्याची डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये २ वाट्या पाण्यात २ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा
  • शिजलेल्या डाळीत साखर आणि आंब्याचा गर एकत्र करून मंद आचेवर गरम करत राहा
  • मिश्रण थोडं घट्ट झालं की त्यात वेलदोडा आणि जायफळ पूड टाका आणि मिश्रण पूर्ण थंड करा
  • तयार मिश्रणाला पुराणाच्या साच्यात घालून पुरण तयार करा
  • आता गव्हाच्या पिठाचे गोळे करा आणि यात तयार पूर्ण व्यवस्थित भरून घ्या
  • एका पिठाच्या गोळ्यात पुरण भरून, जाडसर पोळी लाटा. आंब्याच्या गरामुळे पुरण थोडं ओलसर असते, त्यामुळे हलक्या हाताने पोळी लाटून घ्या
  • गरम तव्यावर ही पोळी दोन्ही बाजूंनी तूप लावून छान खरपूस भाजून घ्या
  • तुमची गरमा गरम आंबा पुरणपोळी तयार आहे
  • आंबा पुराणपोळीला एका प्लेटमध्ये काढा आणि तुपासह खाण्यासाठी सर्व्ह करा
  • आंब्याचा गर खूप पातळ असेल तर पुरण घट्ट करताना जास्त वेळ शिजवा

Web Title: These summer make tasty mango puranpoli at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • food recipe
  • Maharashtrian Recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या
1

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या

Recipe : हॉटेलसारखी मसालेदार आणि क्रिमी पनीरची भाजी कशी बनवायची? आजच रेसिपी जाणून घ्या
2

Recipe : हॉटेलसारखी मसालेदार आणि क्रिमी पनीरची भाजी कशी बनवायची? आजच रेसिपी जाणून घ्या

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने
3

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी
4

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.