त्वचेसाठी गुणकारी बेसन, हळद, दूध फेसपॅक
वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर लगेच दिसून येतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हात गेल्यामुळे चेहरा टॅन होऊन जातो, तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील आद्र्रतेमुळे चेहरा खराब होतो. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी त्वचेची योग्य ती काळजी घेऊन त्वचा निरोगी ठेवणे गरजेचे आहे. वातावरणातील आद्रतेचा परिणाम त्वचेवर दिसू लागल्यानंतर त्वचा तेलकट आणि चिकट होऊन जाते. चिकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ केली नाहीतर पिंपल्स आणि फोड येण्याची शक्यता असते. त्यामुळे फेशवॉश करून त्वचा स्वच्छ केली पाहिजे.(फोटो सौजन्य-istock)
त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी केमिकल उत्पादनांचा वापर न करता, नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. केमिकल उत्पादने काहीवेळा पुरतेचं त्वचेचे सौंदर्य कायम टिकवून ठेवतात. मात्र नैसर्गिक पदार्थ दीर्घकाळ त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. बाजारात अनेक हर्बल आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर करून फेसपॅक आणि मास्क बनवले जातात. पण या मास्कमध्ये सुद्धा काही प्रमाणात भेसळ केलेली असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक चमचा बेसनाचा वापर करून फेसपॅक कसा बनवायचा, याची सोपी पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: सुरकुत्या येऊन चेहरा निस्तेज झाला आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय करा, चेहरा दिसेल सुंदर
स्वयंपाक घरातील पदार्थांमध्ये बेसन, हळद आणि दूध हे पदार्थ असतात. या सर्व पदार्थांचा वापर करून जेवणातील पदार्थ बनवले जातात. तसेच हे पदार्थ त्वचेच्या आरोग्यसाठी सुद्धा प्रभावी आहेत. हळदीमध्ये एंटी ऑक्सिडेंट्स, एंटी इंफ्लेमेटरी गुणधर्मन आढळून येतात. तर बेसनमध्ये मॉईश्चरायजिंग गुण आहेत. दुधामध्ये लॅक्टिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते. तसेच दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक लोक दुधाचा वापर त्वचेसाठी सुद्धा करतात. हळद बेसनाचा फेसपॅक लावल्यामुळे त्वचा मॉईश्चराईज राहते.
हे देखील वाचा: जास्वंदीच्या फुलाचा वापर करून वाढवा चेहऱ्याचे सौंदर्य! काळे डाग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा वापर
त्वचेसाठी हळद बेसन फेसपॅक अतिशय प्रभावी आहे. फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात चिमूटभर हळद मिक्स करा. हळद मिक्स करून झाल्यानंतर त्यात दूध टाका. जास्त दूध टाकून नये, अन्यथा फेसपॅक पातळ होऊ शकतो. दूध टाकून झाल्यानंतर जाडसर फेसपॅक तयार करून त्वचेवर लावा. 15 ते 20 मिनिटं फेसपॅक त्वचेवर लावून ठेवल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.