काय आहेत काळ्या मिरीचे फायदे
काळी मिरी हा असा मसाला आहे की तो भारतातील जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात आढळतो, त्याद्वारे तुम्ही जेवणाची चव वाढवता. पण काळी मिरी कोणत्याही आयुर्वेदिक औषधापेक्षा कमी नाही, त्यात असलेले कॅप्सेसिन शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. अनेकदा काढ्यामध्येही याचा उपयोग करून घेतला जातो.
केवळ खाण्यासाठीच नाही तर काळ्या मिरीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. विशेषतः पुरूषांना स्टॅमिना राखण्यासाठीही याचा फायदा मिळतो. पोषणतज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात काळी मिरी मिसळून सेवन केले तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. (फोटो सौजन्य – iStock)
काळी मिरी वाढवते स्टॅमिना
काळ्या मिरीने वाढतो स्टॅमिना
कोमट पाण्यासोबत काळी मिरी खाल्ल्याने शारीरिक क्षमता वाढते. तसेच शरीरातील पाण्याची कमतरता नियंत्रित राहते. विशेषतः काम करणाऱ्या पुरुषांसाठी हे अतिशय आरोग्यदायी मानले जाते. तुम्ही सकाळी उठून काळ्या मिरीचे पाणी पिण्याने स्टॅमिना चांगला राखला जातो. मात्र त्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
हेदेखील वाचा – सतत थकवा जाणवतो? मग नैसर्गिकरित्या स्टॅमिना वाढवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन
पोटाचा त्रास दूर होईल
पोटाच्या त्रासावर राहील गुणकारी
पोटात गॅस होत असल्यास किंवा ॲसिडिटी असल्यास लिंबाच्या रसामध्ये चिमूटभर काळे मीठ आणि काळी मिरी पावडर मिसळून प्याव्यात, दुखण्यापासून काही क्षणात आराम मिळेल. काळी मिरी ही अनादी काळापासून औषध म्हणूनही वापरली जाते. तर आयुर्वेदातही याचा उल्लेख आहे. त्यामुळे पोटाचा त्रास होत असल्यास काळी मिरीचा उपयोग करून घ्यावा
हेदेखील वाचा – वयाच्या पन्नाशीतही मिळेल विशीतला स्टॅमिना; करा ‘हा’ सोपा उपाय
तणाव दूर होईल
तणाव दूर करण्यासाठी काळ्या मिरीचे फायदे
सध्या ताणतणावामध्ये दर 10 पैकी 9 जणांना त्रास होताना दिसून येत आहे. तर काळ्या मिरीमध्ये पाइपरिन असते आणि त्यात नैराश्यविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे काळी मिरी तणाव आणि नैराश्य दूर करण्यात मदत करते. तुम्हीही तणावात असाल तर काळ्या मिरीचे एखादे ड्रिंक तुम्ही सेवन करू शकता.
हिरड्या कमकुवत होणार नाहीत
हिरड्यांचा कमकुवतपणा कमी करण्यासाठी
काळी मिरी हिरड्या दुखण्यापासून लवकर आराम देते. काळी मिरी, माजूफळ आणि सैंधव मीठ समप्रमाणात एकत्र करून त्याची पावडर बनवा. त्यानंतर मोहरीच्या तेलाचे काही थेंब मिसळा आणि दात आणि हिरड्यांवर लावा आणि अर्ध्या तासानंतर तोंड धुवा. यामुळे तुमच्या दात आणि हिरड्यांमधील दुखण्याची समस्याही दूर होईल. हा घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल.
कर्करोग टाळेल
कर्करोग होण्यापूर्वी घ्या काळजी
महिलांसाठी काळी मिरी खाणे खूप फायदेशीर आहे. काळ्या मिरीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फ्लेव्होनॉइड्स, कॅराटिन्स आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. सध्या ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही नियमित काळ्या मिरीचा वापर करून घेऊ शकता.
सर्दीची समस्या दूर होईल
सर्दीच्या समस्येसाठी वापरा
याशिवाय सर्दी झाल्यास गरम दुधात काळी मिरी मिसळून प्यायल्याने आराम मिळतो. सर्दी वारंवार होत असेल किंवा सतत शिंका येत असतील, तर काळी मिरींची खाण्याची संख्या एकापासून सुरू करून पंधरापर्यंत रोज एकाने वाढवावी आणि पंधरावरून एक येईपर्यंत दररोज एक कमी करावी. अशा प्रकारे तुम्हाला थंडीच्या समस्येपासून आराम मिळेल.
डिहायड्रेशनची समस्या दूर होईल
डिहायड्रेशनसाठीही ठरेल उपयोगी
डिहायड्रेशनची समस्या असल्यास कोमट पाण्यासोबत काळी मिरी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. यामुळे थकवाही येत नाही. यासोबतच त्वचेमध्ये कोरडेपणा येत नाही. तुम्ही तिन्ही ऋतूंमध्ये काळ्या मिरीचा नक्कीच वापर करून घेऊ शकता आणि आपली त्वचा अधिक चांगली ठेऊ शकता
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.