Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात मुंबईपासून जवळ महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या, इथले सौंदर्य तुमची समर ट्रिप करतील संस्मरणीय

Summer Travel : समर वेकेशनसाठी मुंबईपासून जवळ थंड हवेची ठिकाणे शोधत आहात मग आजची बातमी तुमच्या कामाची आहेत. पर्यटकांच्या यादीत नेहमीच समाविष्ट असलेल्या या ठिकाणांची यादी जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: May 08, 2026 | 08:30 AM
उन्हाळ्यात मुंबईपासून जवळ महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या, इथले सौंदर्य तुमची समर ट्रिप करतील संस्मरणीय

उन्हाळ्यात मुंबईपासून जवळ महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या, इथले सौंदर्य तुमची समर ट्रिप करतील संस्मरणीय

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुंबईजवळील थंड हवेची ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
  • निसर्गरम्य दऱ्या, धबधबे आणि साहसी उपक्रमांमुळे ही ठिकाणे कुटुंबांसाठी ठरत आहेत परफेक्ट डेस्टिनेशन.
  • वीकेंड ट्रिपसाठी कमी वेळात पोहोचता येतील अशी अनेक सुंदर पर्यटनस्थळे महाराष्ट्रात आहेत.
उन्हाळा ऋतू सुरु झाला असून आता उष्णतेने लोक हैराण झाले आहेत. हा एक असा काळ आहे जो फिरण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. याकाळात लहान मुलांनाही उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात ज्यामुळे संपूर्ण कुटुंबासोबत फिरण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. महाराष्ट्रामध्ये समर वेकेशनसाठी अनेक सुंदर आणि निसर्गाने भरलेली ठिकाणे आहेत. या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही तुमच्या सुट्टीचा काळ संस्मरणीय बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला या लेखात महाराष्ट्रातील अशी काही थंड हवेची ठिकाणे सांगणार आहोत ज्यांना तुम्ही मुंबईहून सहज भेट देऊ शकता. मुंबईच्या आसपासच्या परिसरात काही सुंदर थंड हवेची ठिकाणे आहेत, ज्यांना तुम्ही आवर्जून भेट द्यायला हवी. चला या ठिकाणांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

लोणावळा

लोणावळा हा मुंबईजवळील सर्वात लोकप्रिय थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे तुम्हाला धरणे, भव्य किल्ले, धबधबे, गुहा, मंदिरे आणि रिसॉर्ट्ससारख्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देता येते. इथे तुम्ही प्राचीन मंदिरे आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकता. यासोबतच इथे तुम्हाला ट्रेकिंगचाही आनंद घेता येतो. मुंबईपासून हे ठिकाण ९५ किमी अंतरावर आहे. हे अंतर कापण्यासाठी तुम्हाला २ तासांचा अवधी लागतो. तुम्ही इथे टायगर्स लीप, डेला ॲडव्हेंचर पार्क, बुशी धरण, विसापूर किल्ला या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता.

माथेरान

माथेरान हे महाराष्ट्रातील दुसरे लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबईपासून ११० किमी अंतरावर वसलेल्या या ठिकाणाला भेट देण्यासाठी २.५ तासांचा अवधी लागतो. ट्रेकिंगचा आनंद लुटायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते करता येणार आहे. इथले धबधबे आणि हिरवळीचे नैसर्गिक सौंदर्य कुणालाही क्षणात मोहित करुन टाकणारे ठरते. इथे तुम्ही घोड्याची सैर आणि टाॅय ट्रेनच्या सफरीचा आनंद लुटु शकता. यासोबतच दोधनी धबधबा, इर्शालगड किल्ला, चंदेरी लेणी ही इथली काही प्रमुख ठिकाणे आहेत.

पाचगणी

मुंबईपासून २५० किमी अंतरावर वसलेले हे ठिकाण निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणांसाठी सुप्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला तलाव, पर्वत आणि घनदाट झाडीचे दृष्य पाहायला मिळेल. यासोबतच तुम्ही इथे पॅराग्लायडिंग आणि गो-कार्टिंगसारख्या साहसी खेळांचाही अनुभव घेऊ शकता. हे ठिकाण नौकाविहार, वेण्णा तलाव, पॅराग्लायडिंग, निसर्गदर्शन, टेबल लँड, पाचगणी मेण संग्रहालय यांसाठी लोकप्रिय आहे.

Travel News : कैलास मानसरोवर यात्रा 2026 चे रजिस्ट्रेशन सुरू, किती असेल खर्च? जाणून घ्या

महाबळेश्वर

महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे ठिकाण कुणाला माहिती नाही. स्ट्रॉबेरी आणि समृद्ध वनस्पती आणि थंड वातावरणासाठी हे ठिकाण फार लोकप्रिय आहे. या ठिकाणी पर्यटकांना हिरवीगार डोंगररांग, दऱ्या आणि धबधबे यासोबतच वेण्णा तलाव, सनसेट अँड सनराईज पॉईंट, बाजार, मॅप्रो गार्डन, स्ट्रॉबेरी गार्डन, कनॉट पीक, महाबळेश्वर मंदिर अशा अनेक लोकप्रिय ठिकाणांना भेट देता येते. मुंबईपासून २७५ किमी अंतरावर वसलेले हे ठिकाण समर वेकेशनसाठी एक परफेक्ट चाॅईस ठरते. मुंबईहून इथे जायला जवळपास ५ तासांचा वेळ लागतो.

Web Title: Top hill stations near mumbai for summer vacation travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • maharashtra
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.