Vastu Shastra Married Daughter: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
5 Things Parents Should Avoid Giving Their Married Daughter: मुलीचं लग्न झाली की सासरी होऊन जाते. माहेरी आल्यावर आई-वडील लेकीला कधीच रिकाम्या हाती पाठवत नाही. लोणचं. पापड, कपडे यासारख्या वस्तू मायेपोटी दिल्या जातात.पण तुम्हाला माहिती आहे का? अशा काही गोष्टी आहेत, वास्तुशास्त्र आणि जुन्या लोकांच्या मान्यतेनुसार लेकीला सासरी जाण्यावेळी या गोष्टी दिल्या जात नाही, कोणत्या त्या जाणून घेऊया..
आपण अनेकदा नवीन संसारासाठी मुलीला चाकू, कात्री किंवा धारदार भांडी देतो. पण वास्तुशास्त्रानुसार हे चुकूनही करू नका. कारण धारदार वस्तू दिल्याने नात्यात दुरावा येतो असं मानलं जातं. या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि नवरा-बायकोमध्ये किंवा सासू-सुनेमध्ये गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे अशा वस्तू देणं टाळा. तिला हव्या असतील तर तिने सासरी स्वतः विकत घेतलेल्या चांगल्या असतात.
पूर्वीच्या काळी मुलीला निरोप देताना चूल किंवा शेगडी देण्याची पद्धत होती. पण आता असं म्हणतात की माहेरहून मुलीला गॅस शेगडी, लायटर किंवा आगीशी संबंधित कोणतीही वस्तू देऊ नये. आगीचा संबंध हा भांडण राग यांच्यासोबत जोडला जात आहे, त्यामुळे माहेरहून अशी कोणतीही वस्तू मुलीला दिला तर तिच्या सासरी सतत तणाव वाद होतो अशी मान्यता आहे. Vastu Shastra Married Daughter:
उन्हाळ्याच्या सुट्टीला आलेल्या लेकींला आई तिच्या आवडीचे लोणचे मायेपोटी आणि प्रेमापोटी कैरीचे किंवा लिंबाचे लोणचे तयार करुन देते. मात्र वास्तूशास्त्रानुसार असे सांगितले आहे की, विवाहित मुलीला माहेरहून जास्त आंबट लोणचं देऊ नये. आंबटपणाचा संबंध तिच्या सासरच्या नात्यांशी जोडलेला आहे, लोणचं आंबट असते तसचं तिचं नात्यात गोडवा राहत नाही. त्यामुळे लोणचं द्यायचं असेल तर थोडं द्या किंवा गोड लोणचं द्या. पण आंबट लोणच्याचा मोठा डबा देणं टाळा.
आजकाल वाढदिवसाला किंवा नवीन घरासाठी झाडं गिफ्ट देण्याची फॅशन आली आहे. पण मुलीला कधीच कॅक्टस किंवा काटे असलेली कोणतीही झाडं भेट म्हणून देऊ नका. काटेरी झाडांमुळे तिच्या घरात अशांतता येते, सतत टोचल्यासारखं वातावरण राहतं असं वास्तुशास्त्र सांगतं. घरात भांडणं वाढतात. त्या ऐवजी तुम्ही मनी प्लांट, तुळस किंवा गुलाबाचं रोप देऊ शकता ते शुभ मानलं जातं.
Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
काळा रंग बऱ्याच जणींना आवडतो. पण शुभ कार्यात आणि खास करून माहेरहून मुलीला काही देताना काळ्या रंगाचे कपडे देऊ नका. आपल्या धर्मात काळ्या रंगाला नकारात्मकतेचं प्रतीक मानतात. चांगल्या प्रसंगावेळी काळा रंग हा बहुतेक वेळी अशुभ मानला जातो. त्यामुळे मुलीला कपडे देताना लाल, हिरवा, पिवळा असे छान रंगीत कपडे द्या. त्याने नात्यात गोडवा टिकून राहतो. या 5 गोष्टी ज्या विवाहित मुलीला मोहरीहून सासरी भेट म्हणून दिल्या जात नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






