Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : पुतना कुंडात आजही भरलेलं आहे विष, हेच ते ठिकाण जिथे श्रीकृष्णाने राक्षिसीनीचा केला होता वध

Putna Kund : भगवान कृष्ण आणि पुतनाची कथा तर तुम्हाला ठाऊकच असेल. राक्षसी पुतना कृष्णाला मारण्यासाठी गोकुळात आली होती पण वयाच्या सहा दिवसांतच कृष्णाने तिचा वध केला. पुतना कुंड नावाने लोकप्रिय असलेले तलाव आजही मथुरेत उपस्थित आहे. यातील पाण्यात विष असल्याचे म्हटले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 12, 2026 | 08:17 AM
Travel News : पुतणा कुंडात आजही भरलेलं आहे विष, हेच ते ठिकाण जिथे श्रीकृष्णाने राक्षिसीनीचा केला होता वध

Travel News : पुतणा कुंडात आजही भरलेलं आहे विष, हेच ते ठिकाण जिथे श्रीकृष्णाने राक्षिसीनीचा केला होता वध

Follow Us
Follow Us:
  • मथुरा–गोकुळ परिसरातील एक प्राचीन धार्मिक स्थळ आजही श्रीकृष्णाच्या बाललीलेशी जोडले जाते.
  • पौराणिक मान्यतांमुळे हे ठिकाण भाविक आणि पर्यटकांमध्ये विशेष आकर्षणाचे केंद्र आहे.
  • जीर्णोद्धारानंतरही या स्थळाच्या देखभालीबाबत स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मथुरेतील कंसाच्या तुरुंगात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. पण जन्मानंतर लगेचच वासुदेवाने त्यांना एक टोपलीत टाकून यमुना नदीच्या पार गोकुळात आणले. इथे त्यांनी नंदराय यांच्या घरी बाळ गोपाळाला ठेवले आणि ते तेथून परतले. अशाप्रकारे सुरु झाली कृष्ण लीला. कंसाचा वध हा कृष्णाच्या हाताने होणार असतो हेच कारण आहे की जन्मापासूनच कंस कृष्णाला मारण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढत असतो. त्याने जन्मानंतरच कृष्णाला मारुन टाकण्याने आदेश दिलेले असतात पण सृष्टीच्या मनात काहीतरी वेगळेच असते. जेव्हा कंसाला समजतं की, कृष्ण अजूनही जिवंत आहे तेव्हा तो अनेक वेगवेगळ्या मार्गांनी त्याला मारण्याचा प्रयत्न करु लागतो.

भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क

६ दिवसांत ठार मारण्याचा कट

जेव्हा कृष्ण ६ दिवसांचा असतो तेव्हा कंसाची राक्षसी बहिण पुतना त्याला ठार मारण्याचा कट रचते. ती एका सुंदर नारीचे रुप धारण करते आणि कृष्णाच्या शोधात गोकुळात पोहचते. आपले विषारी दूध पाजून तिने कृष्णाला मारण्याचा कट रचलेला असतो परंतु तिचा कट उधळून लावून कृष्णच पुतनाचा वध करतो. त्यानंतर हळूहळू कृष्णाने कंसाने पाठवलेल्या आकासुर, वाकासुर यांसारख्या अनेक राक्षसांना ठार मारले, त्यांना मुक्त केले आणि मोक्षप्राप्तीसाठी मदत केली.

आजही पुतना कुंड उपस्थित

गोकुळाकडे ३०-४० पाऊले टाकल्यानंतर एक विद्रूप लाल दगडाचे स्थळ दिसते. हे तेच ठिकाण जिथे ५,२०० वर्षांपूर्वी, पुतना राक्षसीने कृष्णाला दुधाऐवजी विष पाजण्याचा प्रयत्न केला होता. हे ठिकाण पुतना कुंड म्हणून ओळखले जाते. २०१४-२०१५ मध्ये, ५० लाख रुपये खर्च करुन पुतना कुंडाचा जीर्णोद्धार करण्यात आला. परंतु अवघ्या तीन वर्षातच ते पुन्हा एकदा जीर्ण अवस्थेत पोहचले आहे.

कोणत्या स्वर्गाहून कमी नाही… समुद्राच्या आत वसलाय सुंदर देश, कुठे आहे ते जाणून घ्या

रस्त्याच्या कडेला पर्यटन विभागाने पांढऱ्या रंगात लावलेल्या साईन बोर्डाच्या आधारे ते पुतना कुंड असल्याचे स्पष्ट होते. तलावाभोवती लाल दगडांचे बाकडे तयार करण्यात आले आहे. इथे विश्रांतीसाठी दगडाचा एक व्हरांडा देखील तयार करण्यात आला आहे. एकेकाळी हा तलाव फार विशाल होता परंतु सुशोभीकरणानंतर का कुंड जवळपास अडीचशे चौरस यार्डांपर्यंत आटला. स्थानिकांचा आरोप आहे की, पर्यटन विभागाने तलावाच्या सुशोभीकरणानंतर याकडे पुन्हा पाहिले नाही. यातील पाण्यात आजीही विष असल्याचे म्हटले जाते. याच्या काठावर आणि किनाऱ्यावर बाभूळाची झाडे वाढली आहेत.

 

Web Title: Travel news putna kund in gokul the mythological site associated with lord krishna and putana legend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 08:17 AM

Topics:  

  • mathura
  • Shri Krishna
  • travel news

संबंधित बातम्या

कोणत्या स्वर्गाहून कमी नाही… समुद्राच्या आत वसलाय सुंदर देश, कुठे आहे ते जाणून घ्या
1

कोणत्या स्वर्गाहून कमी नाही… समुद्राच्या आत वसलाय सुंदर देश, कुठे आहे ते जाणून घ्या

250 वर्षांपासून या जल महालाचे चार मजले आहेत पाण्यात, अनोखा आहे इथला इतिहास
2

250 वर्षांपासून या जल महालाचे चार मजले आहेत पाण्यात, अनोखा आहे इथला इतिहास

Mahabharata Story: कुंतीच्या हातचे लाडू खाताच भीमाला का आला ढेकर? जाणून घ्या महाभारतातील कथा
3

Mahabharata Story: कुंतीच्या हातचे लाडू खाताच भीमाला का आला ढेकर? जाणून घ्या महाभारतातील कथा

Travel News : निवृत्तीनंतर शांत आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर परदेशातील ही 6 ठिकाणं आहेत परफेक्ट
4

Travel News : निवृत्तीनंतर शांत आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर परदेशातील ही 6 ठिकाणं आहेत परफेक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.